Thursday, November 21, 2024
Homeगुन्हामहिला पोलिसाशी झटापट : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

महिला पोलिसाशी झटापट : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

महिला पोलिसाशी झटापट : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दुचाकीस्वार महिलेकडे लायसन्स नसल्याने महिला वाहतुक पोलिसाकडून कारवाईसाठी फोटो काढीत होत्या. यावेळी महिलेसह तिच्या मुलाने महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारा आकाशवाणी चौकात घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, याप्रकरणी महिलेसह तिच्या मुलाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहर वाहतुक शाखेतील महिला पोलिस कर्मचारी या बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांची आकाशवाणी चौकात ड्युटी लावण्यात आली होती. महिलेचा कर्तव्यावर हजर असतांना  एमएच १९, डीसी ९१६७) क्रमांकाच्या दुचाकीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महिला तिच्या मुलासह आकाशवाणी चौकाकडे येत होत्या. महिला पोलिसाने त्या महिलेला थांबवून त्यांच्याकडे लायसन्स बाबत विचारणा केली. दरम्यान, पोलिसाकडून महिलेचा फोटो काढून चलन टाकत असतांना, महिलेसह तिच्या मुलाने पोलिसासोबत हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला फोटो काढण्याची परवानगी कोणी दिली, तसा आदेश दाखवा असे ते म्हणू लागले.

महिला पोलिस कर्मचाऱ्याने त्या दोघ मायलेकांना वाहतुक पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याला अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांचा मोबाईल जमीनिवर आपटून नुकसान केले. यामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या खिशात हात टाकून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
महिला पोलिसाने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार झटापट करणाऱ्या महिला सीना ध्रुव ठाकूर व त्यांचा पती ध्रुव सेवाराम ठाकूर व त्यांचा अल्पवयी मुलगा (सर्व रा. शामा कॉम्पलेक्स, गणपती नगर) यांच्याविरुद्ध शासकीय कामा अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाघ हे करीत आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या