Thursday, November 21, 2024
Homeजळगावमाजी आमदार संतोष चौधरी डॉ मानवतकर यांना पाठिंबा दिल्याने भुसावळ मतदार संघाचे...

माजी आमदार संतोष चौधरी डॉ मानवतकर यांना पाठिंबा दिल्याने भुसावळ मतदार संघाचे चित्र बदलणार

माजी आमदार संतोष चौधरी डॉ मानवतकर यांना पाठिंबा दिल्याने भुसावळ मतदार संघाचे चित्र बदलणार

आजच्या निर्णयामुळे डॉ मानवतकर यांचे पारडे जड होणार

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ रणधुमाळी सुरू झालेली आहे. विधानसभा -१२ (अ.जा) साठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकर हे निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरले असून त्यांची लढत अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांच्यासोबत आहे.भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिले असून या निर्णया मुळे भुसावळ मतदार संघात चित्र बदलणार असल्याचे संकेत आहेत .
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,वरणगांव रोडवरील हॉटेल राधाकृष्ण येथे सकाळी १२:०० वाजता भुसावळ तालुक्यातील मुख्य कार्यकर्ते, पदाधिकारी माजी नगरसेवक उल्हास पगारे, माजी नगरसेवक सचिन पाटील, समाजसेवक प्रदीप देशमुख, खन्ना कोळी, माजी नगरसेवक सलीम हाजी साहब पिंजरी शेख इम्तियाज समाज सेवक फिरोज रहमान शेख शेख जाकिर शेख सरदार माझे नगर सेवक तम्मा पहलवान माझी नगर सेवक विनोद निकम जुनैद अशरफ खान समाज सेवक अकबर गवली समाज सेवक अहमद कुरेशी माजी नगरसेवक अमीन भाई कुरैशी समाज सेवक सोहन भाई पठान समाजसेवक यांची बैठक माजी आमदार संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी बैठकीमध्ये
कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे विचार विनिमय तसेच कार्यकर्त्यांच्या भावना माजी आमदार संतोष यांनी समजून घेतल्या. निवडणुकीमध्ये कार्यकर्ते हे महत्वाचे असतात माजी आमदार संतोष चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्या उमेदवाराला मतदान करणार या अनुषंगाने कार्यकत्यांचे मतदान घेण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी सर्वानुमते डॉ.राजेश मानवतकर यांच्या नावाची पसंती केली व पाठिंबा दिला.
भुसावळ तालुक्यातील उमेदवार निवडणूक आणण्यासाठी भुसावळ तालुकाचा ठरविल. विधानसभा निवडणुकीमध्ये भरगच्च मतांनी डॉ.राजेश मानवतकरांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी हे पूर्ण ताकदीने उतरले आहे.आता पर्यंतचा इतिहास आहे माजी आमदार संतोष चौधरी यांनी ज्या उमेदवाराला साथ दिली आहे तो आद्यपावतो सत्ता भोगत आहे. विद्यमान आमदार सुद्धा संतोष चौधरी यांचे बोट धरून राजकारणात आले आहे .

” विनाशकाली विपरीत बुद्धी असणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली असून मला लोकांची गरज नाही त्यांना माझी गरज आहे अशांचा माज उतरविण्याची वेळ आलेली आहे.”

खरी लढाई महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.राजेश मानवतकर व अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांच्या मध्ये आहे. भाजपा भुसावळ विधानसभेत तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे.भुसावळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जागा सुटल्याने एकमेकांना साथ देवून महाराष्ट्राला वाचवायचा आहे.यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांनी डॉ.राजेश मानवतकर यांना भुसावळ विधानसभेत निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी जयेश संतोष चौधरी यांच्याकडे सोपविली आहे. यामुळे युवा शक्ती सुद्धा महाविकास आघाडी सोबत आली आहे .
गेले पंधरा वर्षात विकास फक्त जवळच्या चांडाल चौकडीचा झालेला आहे.हे जनतेलाही चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.महाराष्ट्रात परिस्थिती भाजप विरोधात आहे गुजरातच्या निवडणुकीमध्ये यांनी दंगली घडवल्या होत्या.काही गुजराती भुसावळातही आलेले आहे. निवडणुकी दरम्यान दंगली घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशांवर लक्ष ठेवा. महाराष्ट्राने गुजराथी यांच्या नादी लागून वाट लावली आहे गुजराथी पासून वाचवायच आहे.आजच्या निर्णयामुळे डॉ मानवतकर यांचे पारडे जड होणार असून महायुती उमेदवारास मोठा धक्का मानला जात आहे .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या