दिपनगरात पायी चालत आल्यावर चमत्कार झाला !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मानसिक संतुलन बिघडल्यामुळे बेळगाव येथील कुटुंबा पासून दुरावलेला एक २९ वर्षीय तरुण भुसावळ मध्ये उतरला मात्र त्याला रस्ता सुचेल तिकडे पायी चालत गेला. चालत असतांना दिपनगर येथे पोचला.बोलता येईना, काय करतोय लक्षात येईना आणि चमत्कार घडला तरुण मुलांच्या नजरे पडला. आणि तरूणांनी चौकशी केली तर कुंटूबांचा लेखाजोखाच त्याच्या खिशात सापडला. कुंटूबातील आई आणि जावईं यांना दिपनगर येथे बोलाऊन त्यांच्या स्वाधिन त्याला केला.
मराठवाडयाच्या बेळगाव जिल्हयातील खानापुर येथे राहणारा २९ वर्षीय तरूण भुषण पाटिल यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याच्या डोक्यात चक्कर पडला घर सोडून बाहेर पडला कुठे जातोय कळेना बुधवार (ता. १८ ) रात्री दोन वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरून बाहेर आला रस्ता कळेल तीकडे भुषण चालत होता. पाण्याची तहान आणि जेवणाच्या भुखे मुळे पुर्णता व्याकुळ परीस्थीतीत दोन दिवस पायी चालत दिपनगरात पोचला. तीकडे बेळगावात त्याच्या परीवारातील मंडळींचा शोध घेणे सुरू होता. भुषण सापडत नसल्याने थकलेल्या आईने आशा सोडली नाही.आज ना उद्या मुलगा परतेल अशी आशा आईला होती. भुषण दिपनगर येथे पोचताच एक प्रभावी चमत्कार झाला आणि गजू तायडे संचालक पतसंस्था दिपनगर, किशोर बराटे, संदीप कचरे, लोकेश अनिकेत सोळसकर , राठोड ,अक्षय राठोड, निलेश पवार, स्वप्निल तायडे, गिरीश गायकवाड, अनुरागमनी मनोज मोरे ,महेंद्र ठाकरे, विजय कुंभार, मुकेश रेड्डी ,निलेश सूर्यवंशी, समाधान सपकाळे ,सुशील सोनवणे, संकेत कवठे, सागर वाघमारे ,बब्बू सिंग, स्वप्निल चौधरी, गोलू इंगळे.आदि.तरूण मंडळीच्या नजरेस पडला तरुणांनी त्याची चौकशी व विचारपुस केली मात्र भुषण मनोरुग्ण असल्याने कोणाला काही सांगु शकत नाही. हे तरूणांच्या लक्षात आल्यावर त्याच्या साहित्याची पाहणी केली त्याच्या कडे त्याची ओळख पटावी या करीता काहि पुरावे मिळतात का ? मात्र परमेश्वराची कृपा त्याच्या एका खिशात त्याचा पासपोर्ट साईज फोटो आढळला फोटो मागे फोटोग्राफरचा पुसट अक्षरात मोबाईल क्रमांक मिळून आला. तरुणांनी क्रमांकावर फोन लावला आणि भुषण चा फोटो त्याला दाखवताच त्याने भुषण ला ओळखले त्यानी भाषणच्या आईला जेव्हा तुमचा मुलगा सापडला आहे असा फोन गेला त्यावेळी त्या आईचा आनंद गगनात न मावणारा होता. खरं तर आम्ही तो जिवंत असण्याची आशाच सोडली होती, पण आज आमचं लेकरू हयात आहे हे ऐकल्यावर झालेला आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही, अशी त्याच्या आईची भावना होती.
सोबत दिपनगरातल्या तरूणांशी बोलणे केले. भुषणच्या कुटुंबीयांना इकडे यायला दोन दिवस लागले तो पर्यत त्याच्या जेवणाची व झोपण्याची येथील तरुणांनी आधिच केली होती.तसेच त्याचे जावई आई यांच्याशी संपर्क केला १९ तारखेला त्याची आई मित्र तसेच भाऊजी गोवा एक्सप्रेस ने बेळगाव येथून भुसावळ साठी रवाना झाले तोपर्यंत रात्रभर दिपनगर येथील तरुणांनी त्याला जेवण भरवले कपडे दिले. त्याची झोपायची व्यवस्था करून त्याच्यावर रात्रभर लक्ष ठेवले. सकाळी त्याच्या आई जावई यांच्या कडे त्याला सुखरूप स्वाधीन केले.मात्र भुषणच्या आईने मन भरून तरूणांना आशीर्वाद दिले.