मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र उभारा
आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला पत्र
मुक्ताईनगर प्रतिनिधी :- खानदेश लाईव्ह न्युज
जळगाव जिल्हा सह मुक्ताईनगर तालुक्यात देखील उष्णतेचा पारा वाढत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा फटका बसू नये यासाठी खबरदारी म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तहसीलदार उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ उष्माघात केंद्र स्थापन करणे बाबत 6 मे रोजी पत्र पाठविले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सद्यस्थितीत मे महिना सुरू असून 42 अंशावर तापमानाचा पारा जात आहे. तापमानामुळे उन्हाच्या वाढत्या उकाड्याने उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. तरी नागरिकांना वेळेवर उपचार मिळावा व प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व मुक्ताईनगर शहर येथे तात्काळ उष्माघात केंद्र स्थापन करण्यात यावे असे पत्र आमदार पाटील यांनी दिलेले आहे. तसेच उष्माघातामुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्या करण्यासाठी कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, अनवाणी पायाने बाहेर जाऊ नका, दुपारच्या वेळेस बाहेरचे कामे टाळा, पुरेसे पाणी प्या, कॉटनचे कपडे वापरा, अशक्तपणा किंवा कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टर कडे जा, शरीराचे तापमान वाढलेले किंवा बेशुद्ध गोंधळलेली व्यक्ती नजरेस आल्यास 108 /102 या क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन देखील आमदार चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना केले आहे.