मोटार सायकल सह दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात !
वरणगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – वरणगाव येथील बोदवड रस्त्यावरील तिर्थक्षेत्र नागेश्वरजवळ पोलिसांची गस्त सुरू असताना दोघं मोटर सायकल स्वारांना अडविले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे चौकशी केली असता मोटरसायकल चोरीची मिळून आली त्यामुळे दोघांना पोलिसांनी मोटारसायकलीसह ताब्यात घेतले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथून जवळच असलेल्या सुसरी येथील वीटभट्ट्यांवर काम करणारे अजय कालू वाघ व 22 राहणार बोरगाव तालुका जामनेर यांची एम एच 19 इ इ 39 60 क्र . ची काळ्या रंगाची पल्सर गाडी ही दिनांक 20 फेब्रुवारी 24 रोजी रात्रीचे सुमारास चोरीस गेली होती त्याबाबतची फिर्याद 27 फेब्रुवारी रोजी वरणगाव पोलिसांमध्ये दिल्यामुळे गुन्हा नोंद केलेला होता . दिनांक 20 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे पोलिसांची गस्त सुरू असताना नागेश्वर जवळ मोटरसायकल स्थारांना हटकले असता त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून सखोल चौकशी केली त्यावेळी त्यांनी सदर क्र . ची काळ्या रंगाची पल्सर गाडी ही नंबर प्लेट बदलवून वापरत असल्याचे निदर्शनास आले . त्यावेळी चेचीस नंबर व इंजिन नंबरची तपासणी केली असता सदरची गाडी ही अजय कालू वाघ यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे यावरून रवींद्र राजू मोरे वय 19 राहणार भानखेडा व शिवदास पंडित सोनवणे वय 18 राहणार साळशिंगी तालुका बोदवड या दोघा संशयीतांना वरणगाव पोलिसांनी गाडीसह ताब्यात घेतले आहे . ही कामगिरी वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी यांचे सह त्यांचे सहकारी यांनी केली ..