Thursday, November 21, 2024
Homeगुन्हामोठी बातमी : गुन्हेगारांना झटका...'एमपीडीए' अंतर्गत सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई !

मोठी बातमी : गुन्हेगारांना झटका…’एमपीडीए’ अंतर्गत सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई !

 गुन्हेगारांना झटका…’एमपीडीए’ अंतर्गत सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आगामी काळात येणारे सण गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने जिल्ह्यातील रेकॉर्डवरील ३ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आले आहे.जळगाव एमआयडीसी, यावल पोलीस स्टेशन आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीनही गुन्हेगरांना नागपूर आणि मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करावे असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुपारी ३ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांमुळे कळविले आहे.जळगाव शहरातील आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (वय-२४) राहणार तुकाराम वाडी, जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश मधुकर बिन्हाडे (वय-२२) राहणार सिद्धार्थ नगर, यावल यांच्यावर १० वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवीण उर्फ (डॉन) गोपाळ तायडे (वय-२८) राहणार पाडळसा ता. यावल यांच्यावर तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तिघांवर यापुर्वी पोलीसांकडून नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या.तिघांमध्ये कोणत्याची प्रकारची सुधारणा होत नव्हती. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी त्यांच्यावर अंकूश लावण्यासाठी एमपीडीए कायद्यांर्गत कारवाई करत स्थानबध्द करण्यात यावे असा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला.
दरम्यान, तिघांच्या प्रस्तावाचे अवलोकन करून मंजूरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार रेकार्डवरील गुन्हेगार आकाश उर्फ (खंड्या) सुकलाल ठाकूर याला नागपूर कारागृहात व आकाश बिन्हाडे आणि प्रवीण उर्फ (डॉन) तायडे या दोघांना मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या