जलसंपदा विभाग नाशिक कार्यालयाकडे तक्रार.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जलसंपदा विभाग नाशिक कार्यक्षेत्रातील जळगाव येथील यांत्रिकी विभागीय पथक जळगाव कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे यांनी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी केल्याने जलसंपदा विभाग नाशिक काय कारवाई करणार..? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की,माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार यांत्रिकी विभागीय पथक जळगाव कार्यालया अंतर्गत असलेल्या मशिनरीवर GPS लावण्यात आलेले आहे.परंतु खर्च मात्र निरंक दाखविला आहे.
संदर्भीय पत्र क्र २ नुसार मशिनरीवर लावण्यात आलेल्या GPS चे पेमेंट रू.४,८३,३०३/- करण्यात आले आहे. क्षेत्रीय कामावर मशिनरी सुरू असल्याचे GPS लोकेशन मागितले असता कार्यालयाकडून मिळाले नाही.निविदेप्रमाणे लावण्यात आलेले चौकीदार,शिपाई,चालक,हेल्पर यांचे हजेरीपत्रकाची माहिती मिळाली नाही,तसेच संबंधित कर्मचाऱ्याचे सही सहित मिळाले नाही, तसेच हजेरी पत्रक हे प्रत्येक महिन्याचे असते.माहिती अधिकरात मागितले असता एकत्रीत एका पेजवर हजेरीपत्रक दिलेले आहे.याचाच अर्थ असा की हजेरी पत्रक नंतर तयार करण्यात आलेले आहे.हजेरीपत्रक कार्यालयात ठेकदाराकडून देतांना आवक रजिस्टर मध्ये नोंद झालेली दिसत नाही.म्हणजे प्रत्यक्षात डमी कामगार कामावर लावतात व भ्रष्टाचार होत आहे.निविदेप्रमाणे लावण्यात आलेल्या कामगारांचे नियमानुसार PF मध्ये रक्कम कार्यालयाकडून जमा केली जात नाही.( Online कर्मचाऱ्याचे Statement काढले असता त्यात निदर्शनास आलेले आहे.कामगाराचे EICS ची रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली नाही.धरणांचे यांत्रिकी कामांचे CCTV फुटेज मागितले असता उपलब्ध होत नाहीत.यांत्रिकी उपविभाग जामनेर येथील कार्यालय प्रत्यक्षात वाघुर कॉलनी नशिराबाद ता.जि.
जळगांव येथे कार्यरत आहे.परंतु शासकीय निरिक्षण व कमचाऱ्यांचे प्रवासभत्ते देयके हे जामनेर
येथून दाखवितात.म्हणजेच Vehical इंधनाचा व रकमेचा भ्रष्टाचार होत आहे.यांत्रिकी मशिनरीद्वारे कालव्यावरील १० ते १५ वर्षे वयाची झाडे सुद्धा यांत्रिकी विभागामार्फत काढले जात आहेत. याबाबत वनखात्याची परवानगी घेतलेली नाही.आपले कार्यालयामार्फत पर्यावरणाचा -हास होत आहे.यांत्रिकी उपविभागाचे कोणतेच कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत.
मशिनरीसाठी लागणारे इंधन भरणे व आणणेसाठी जबाबदार कर्मचारी जसे अभियंता / स्टोअरकिपर हे प्रत्यक्ष जात नाहीत.त्यामुळे निविदेवर लावण्याम आलेले
कामगार ( हे शासकीय नाहीत ) हे आणत असतात.त्यामुळे इंधनाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार
होत आहे.तरी नम्र विनंती आहे की, आपले स्तरावर संबंधित कार्यालयाचे अंतर्गत असलेल्या सर्व कामांची चौकशी व्हावी व अनियमितता व भ्रष्टाचारात गर्क असलेल्या अभियंते,उपविभागीय अभियंते व कार्यकारी अभियंता यांची चौकशी व्हावी.अन्यथा यांचे विरूद्ध उपोषण करण्यात येईल.
यांत्रिकी मशनरीचे गाड्यांचे इन्शुरन्स,P.U.C.काढण्यात आलेली नाही.त्यामुळे प्रदुषण होत असते.तसेच मशिनरीचे नुकसान झाल्यास शासनास भरपाई मिळत नाही.दि.२८
फेब्रुवारी २०२४ ला ( जे.सी.बी.जे. एस. ८१ क्र. २४२६८५७ मशिन ) जळाले होते.या जे.सी.बी. मशिनरीचे इन्श्युरन्स काढलेले असते तर शासनाला नुकसान भरपाई मिळाली असती.तरी
संबंधित जबाबदार व्यक्ती पदाचा गैरवापर करीत असल्याने कार्यकारी अभियंता यांचेकडून नुकसानीची भरपाई करण्यात यावी. अशी मागणी तक्रारदार नितीन सुरेश रंधे यांनी केली आहे यामुळे जलसंपदा विभाग नाशिक मुख्य अभियंता ( यांत्रिकी ) काय कारवाई करणार याकडे लक्ष वेधून आहे.