यावल आगारात वाळू वाहतूक परवाना न काढता वाळूचा वापर..? चौकशी करून कारवाईची मागणी.
यावल दि.२१ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल बस आगारात सुरू असलेल्या शासकीय बांधकामात महसूल विभागाकडून वाहतुकीचा कोणताही परवाना न काढता वाळूचा वापर होत असल्याने चौकशी करून कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी केली आहे.
गेल्या १ ते दीड महिन्यापासून यावल एसटीबस स्टॅन्ड आवारात काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे या बांधकामासाठी वापरली जाणारी वाळू ही तापी नदी पात्रातील असून संबंधित ठेकेदाराने अवैधरीत्या विना परवाना वाळूची वाहतूक करून वाळूचा साठा करून बांधकामासाठी वाळूचा वापर करीत आहे.याकडे यावल महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. इतर अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई होते त्याप्रमाणे बस स्टँड आवारातील काम करणाऱ्या ठेकेदारावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे.
शासकीय बांधकाम,कॉंक्रिटीकरण करताना संबंधित ठेकेदाराला कामाचे पेमेंट करताना संबंधित विभागाकडून गौण खनिजाची रॉयल्टी वसूल करण्यात येत असली तरी या ठेकेदाराने सदरचे काम सुरू करताना वाळू कोणत्या ठिकाणाहून कुठून, कशी आणि केव्हा वाहतूक करणार आहे किंवा वाळू वाहतूक करणाऱ्या कोणत्या ठेकेदाराकडून,कंपनीकडून वाळू खरेदी केली आहे त्या वाळू खरेदी पावत्या ठेकेदाराकडे आहे का..? किंवा शासकीय कामात वाळू वापरणार असल्याची अधिकृत माहिती महसूल विभागाला दिलेली आहे का..? आणि महसूल विभागाने यांना परवानगी दिली आहे का.?इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी यावल महसूल विभागाने चौकशी करून यावल बस स्टॅन्ड आवारात सुरू असलेल्या ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी केली आहे.