Thursday, March 13, 2025
Homeजळगावयावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात बेकायदा जिना बांधकाम सुरू केल्याची...

यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात बेकायदा जिना बांधकाम सुरू केल्याची तक्रार दाखल.

यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात बेकायदा जिना बांधकाम सुरू केल्याची तक्रार दाखल.

यावल दि.१३    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी.    येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित व्यापारी संकुलनात अतिरिक्त बेकायदा जिना बांधकाम सुरू केल्याची तक्रार गाळाधारकांनी तथा दुकानदारांनी केली.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल आणि यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन व्यवस्थापक यांच्याकडे दि.१३ मार्च २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे त्यांच्या मालकीच्या व्यापारी संकुलात यावल येथील भुसावळ रोडला लागून कोणतीही परवानगी न घेता बेकायदा जिना बांधकाम सुरू आहे संस्थेची आर्थिक परिस्थिती उत्पन्नाचे स्त्रोत लक्षात घेता ज्या नवीन जिन्याचे बांधकाम सुरू आहे त्याच्या जवळच व्यापारी संकुलाचा स्थायी जिना सुव्यवस्थित स्थितीत असून तरी त्या जिन्या जवळ पुन्हा नवीन जिन्याची कोणतीही आवश्यकता नसताना जिन्याचे काम सुरू केल्याचे दिसून येत आहे.
या परिस्थितीत संस्थेचे हित बाजूला ठेवून काही वैयक्तिक स्वार्थासाठी व काही मर्जीतल्या लोकांच्या प्रेमापोटी संस्थेला नुकसान होईल असा बेकायदा ठराव आणि निर्णय घेतला गेला आहे,व्यापारी संकुल हे संस्थेचे चांगली व स्थायी उत्पन्नाचे स्त्रोत आहे त्यातील व्यापाऱ्यांचे हित संस्थेने जोपासले पाहिजे, व्यापारी संकुलनातील व्यापाऱ्यांना गाळा धारकांना विश्वासात घेऊन त्यांच्या हिताचे निर्णय संस्थेने घ्यायला पाहिजे,व्यापारी संकुलनात गाळाधारकांच्या सुख सुविधांसाठी दुर्लक्ष करण्यात येत असून प्राथमिक सुविधा जसे की स्वच्छतागृह,मुतारी,साफसफाई इत्यादी सुविधांना महत्त्व प्राधान्य द्यायला पाहिजे मागील,चेअरमन व्हाईट चेअरमन,व्यवस्थापक,
संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे संकुलातील पार्किंगची जागा भाडेतत्त्वाने देण्याचा प्रस्ताव केला गेला आहे आणि त्याकरिता काही लोकांकडून बेकायदा अमानत रक्कम जमा केलेली आहे ते कायदेशीर नसून,याबाबत यावल नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही परवानगी नसताना अतिक्रमित जागेवर व्यवसाय कसे सुरू आहेत,मात्र लोकांनी ती जागा मिळवण्यासाठी अतिक्रमण चालू केले आणि ह्या निर्णयाचा परिणाम म्हणून व्यापारी संकुलनासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.त्यावर ठोस उपाय योजना संस्थेमार्फत करण्यात आली नाही,तसेच संस्थेच्या मालकीच्या संस्थेच्या कार्यालयासमोरील जागा भाड्याने देण्याचा निर्णय संस्थेने कोणtihi कायदेशीर यंत्रणा न राबवता संस्थेचे हित बाजूला ठेवून भाड्याने देण्यात आलेले आहे. संचालक मंडळ आपल्या सोयीनुसार ठराव आणि कामकाज करीत आहेत का..? त्यामुळे संस्थेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
मागील संचालक मंडळाच्या अशाच अनेक चुकीच्या निर्णयामुळे संस्थेची परिस्थिती आज खालावली त्यामुळे सभासदांनी त्या संचालक मंडळास नाकारून नवीन संचालक मंडळावर विश्वास ठेवून झालेल्या निवडणुकीत संचालक मंडळास बहुसंख्य मतदान करून निवडून आणलेले आहे.
तरी संस्थेसाठी चांगले निर्णय घेऊन अनाथायी इतर खर्च टाळून संस्थेची आर्थिक परिस्थिती अधिक चांगली सुधारेल अशा प्रकारे निर्णय घेणे बाबत चौकशी करून कार्यवाही करावी संस्थेच्या नियमाप्रमाणे व्यापारी संकुलातील गाळे भाडे करारनाम्यात बदल करताना संस्थेने आपल्या सोयीनुसार बदल करण्याचे कृत्य सुरू ठेवले आहे.हे बेकायदा कामकाज आणि कृत्य बंद करून संस्थेच्या हितासाठी कार्य करायला पाहिजे व्यापारी
संकुलात काही गाळाधारक व्यापारी या महिला आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आलेले होते पण नंतरच्या काळात ते बांधकाम बेकायदा तोडून टाकले त्यामुळे संकलनात आज रोजी महिलांच्या स्वच्छतेसाठी कोणतीही व्यवस्था संस्थेने केलेली नाही त्यामुळे गाळाधारक महिलांची,व येणाऱ्या महिला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहेत.विद्यमान संचालक मंडळाचे सुद्धा व्यापारी संकुलनातील गाळाधारकांकडे आणि ग्राहकांच्या सुख सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
व्यापारी संकुलनात जिन्याची व्यवस्था असताना आणि गरज नसताना अतिरिक्त जिना बांधकाम करणे हे सहकार कायद्यानुसार चुकीचे आहे.याची चौकशी कारवाई करून संस्थेने व्यापारी संकुलनातील गाळाधारकांच्या सुख सुविधांनाच प्राधान्य द्यावे अशी गाळाधारकांनी लेखी तक्रार (रजिस्टर पोच पोस्टाने ) वजा मागणी आहे, संबंधितांनी चौकशी कार्यवाही न केल्यास पुढील कारवाईस संस्था आणि आपण सर्व संबंधित अधिकारी म्हणून जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे दिलेल्या तक्रार अर्जात व्यापारी संकुलनातील १५ ते २० गाळाधारकांनी / दुकानदारांनी केली आहे.सहकारातील अधिकारी आणि जाणकार नेमकी काय कार्यवाही करणार..? की गाळाधारकांवर राजकीय किंवा संस्थेच्या अटी, शर्तींचा प्रभाव दबाव टाकणार याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या