Thursday, November 21, 2024
Homeजळगावयावल तालुक्यात दिव्यांग क्रांती संघटनेचे काम समाधानकारक.

यावल तालुक्यात दिव्यांग क्रांती संघटनेचे काम समाधानकारक.

परंतु प्रहार जनशक्ती पक्षात काही संधी साधू वैयक्तिक स्वार्थासाठी.

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल रावेर तालुक्यात दिव्यांग क्रांती संघटनेचे व कार्य समाधानकारक असले तरी प्रहार जनशक्ती पक्षात आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी काही संधी साधू आपल्या सोयीनुसार उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांची शुद्ध दिशाभूल करून कट्टर समर्थक असल्याचे वाचून आपले उद्योगधंदे करीत असल्याने याबाबत अनिलभाऊ चौधरी यांनी वेळीच दक्षता घेऊन सतर्कता बाळगावी असे संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात बोलले जात आहे.

दिव्यांग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू भाऊ कडू प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख डॉ.रामदास खोत तथा उत्तर महाराष्ट्र सचिव अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या प्रेरनेने तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना जळगाव जिल्ह्य अध्यक्ष बाळासाहे पाटील साहेब यांच्या आदेशाने व जळगाव जिल्ह्याचे सल्लागार शरद बारजिभे व जिल्हा उपाध्यक्ष मिथुन सावखेडकर यांच्या अध्यक्षते खाली दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी यावल येथे संपन्न झालेल्या मीटिंग मध्ये अनिलभाऊ चौधरी याना प्रहार जनशक्ती तर्फे उमेदवारी घोषित झाली असल्याने त्या संदर्भात दिव्यांग बांधवानी एकत्रित यावे व मोठ्या उत्साहाने अनिलभाऊंना निवडणुकीत आपले सहकार्य करावे असे मार्गदर्शक सूचना व कार्यक्रम घेण्यात आला. व महत्त्वाची माहिती व सूचना जिल्हाध्यक्ष बारजिभे यांनी आपल्या भाषणातून दिल्या तसेच यावल तालुका उपाध्यक्ष हरभाऊ पाटील यांनी देखील भाषणातून दिव्यांग बांधवाना सूचित केल तसेच यावल तालुका अध्यक्ष यांनी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची भक्कम फळी निर्माण करणे बाबत व कामकाजाबाबत माहिती दिली. त्या संदर्भात आलेल्या बोदवड तालुका अध्यक्ष रमेश लोहार उपाध्यक्ष संजय कोळीतसेच यावल तालुका महिला आघाडीच्या सरला ताई तायडे इत्यादी पदाअधिकारी उपस्थित होते त्यांचे फाईल व दप्तर समाधानकारक कशाप्रकारे आहे या संदर्भात मार्गदर्शन केले

या मीटिंगमध्ये उपस्थित यावल तालुका उपाध्यक्ष जनार्धन फेगडे व हरिभाऊ पाटील,शहर उपाध्यक्ष दिलीप चौधरी,शहर संघटक भगवान फेगडे,सचिव अरुण ठाकूर, तालुका संघटक ललित पाटील तसेच सभासद अशोक भावसार, अमृत बारी हे उपस्थित होते व दप्तर संदर्भात मार्गदर्शन चित्ताने ग्रहण केले सर्वांचे आभार प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुका अध्यक्ष प्रविण सोनवणे यांनी मानले. रावेर विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अनिलभाऊ चौधरी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू यांनी जाहीर केली असली तरी रावेर विधानसभा मतदारसंघातील काही ठराविक कट्टर समर्थक हे मात्र अनिलभाऊची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याचेच खास कट्टर समर्थक असल्याचे दाखवून नागरिकांची दिशाभूल करीत आपल्या वैयक्तिकस्वार्थासाठी त्यांचे उद्योगधंदे करीत असल्याचे बोलले जात असून याबाबत अनिलभाऊ चौधरी यांनी वेळीच दक्षता बाळगून पक्ष संघटना कार्यकारणीला महत्त्व द्यावे असा सूर संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघातून निघत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या