यावल नगरपरिषद राष्ट्रीय महामार्गावर ” हायमस्ट ” दिव्याच्या प्रकाशात करीत आहे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रदर्शन.
राजकारणाने,समाजाने,शासनाने नगरपरिषदेचा जाहीर सत्कार करायला पाहिजे.
यावल दि.६ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ) यावल येथे नगरपरिषदेने बुरुज चौकात यावल पोलिसांच्या व यावल तहसीलदार याच्या साक्षीने म्हणजे यावल पोलीस स्टेशन पासून १०० ते २०० मीटर अंतरावर आणि तहसील कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर राजकीय पक्षाकडून मिळालेल्या निधीतून भव्य असा हायमस्ट लॅम्प / खांब उभारला आहे.आणि या खांबावर काल दि. ५ सप्टेंबर २०२४ पासून राष्ट्रीय एकात्मता,जातीय सलोखा,कायदा व सुव्यवस्था शांततेत राहणे कामी एक मला मोठा झेंडा लावला आहे. या झेंड्याचे यावल शहरात सर्व स्तरातून कौतुक होत असून हा पॅटर्न खासदार,आमदार यांनी आपल्या शासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात राबवायला पाहिजे अशी चर्चा यावल तालुक्यात आहे.
यावल शहरात बुरुज चौक म्हणजे यावल शहराची ओळख आणि नाक आहे.शहरात प्रवेश करताना आणि शहराच्या बाहेर जाताना या अतिप्राचीन असलेल्या बुरूज चौकातूनच जावे लागते. आणि या चौकातून बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार सुद्धा गेला आहे,या राष्ट्रीय महामार्गावरून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वर्दळ आणि वाहतूक सुरू असते.या चौकापासून यावल पोलीस स्टेशन आणि यावल ग्रामीण रुग्णालय फक्त १०० ते २०० मीटर,स्टेट बँक,अति प्राचीन शनी मंदिर,पशुवैद्यकीय दवाखाना, सेंट्रल बँक,आणि त्यापुढे यावल तहसील कार्यालय, माध्यमिक कन्या शाळा,आणि सातोद,वड्री रस्ता आहे हा भाग अत्यंत वर्दळीचा आणि वाहतुकीचा पदचारांचा आहे. या भागात नगरपालिकेच्या भूमिकेमुळे आणि नगरपालिकेला कर प्राप्त होत असल्याने व्यवसायिकांची सुद्धा नेहमी आणि सतत मोठी गर्दी असते त्यामुळे पोलीस स्टेशन तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय माध्यमिक शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुला-मुलींना, नागरिकांना,महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु कुठेही वादविवाद भांडण तंटे होत नाहीत आणि जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता,कायदा सुव्यवस्था राखत कोणतीही अप्रिय घटना घडत नसल्याने आणि आता त्यात हाय मस्ट खांबावर एकात्मतेचाच झेंडा फडकल्याने आता मात्र सर्व स्तरातून खरे कौतुक सुरू झाले असून आनंद व्यक्त करीत आहेत.त्यामुळे खासदार,आमदार यांनी यावल शहराचा आणि हाय मस्ट खांबावर प्रकाशात ( लॅम्पजवळ ) लावलेला झेंडा / फलक सर्वांना दिसून येईल अशाप्रकारे प्रदर्शन केल्याचा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवायला पाहिजे अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
तसेच हा पॅटर्न,प्रथेचा शुभारंभ यावल नगरपरिषदेने केल्याने यावल नगरपरिषदेसह हायमस्ट पोल व लॅम्प साठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या लोकप्रतिनिधीचा, पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार त्या ठिकाणच्या प्रकाशात संबंधित सर्व यंत्रणेने करायला पाहिजे अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.