यावल न.प.मुकादम याची बेशिस्त वागणूक यावल पोलीस, नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार.
यावल पो.स्टे.ला अदखलपात्र गुन्हा दाखल.
यावल दि.१ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
काल सोमवार दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी यावल नगरपरिषद कार्यालयात नवरात्र उत्सवानिमित्त
नगरपरिषद कर्मचाऱ्यांची मीटिंग घेण्यात आली त्या मीटिंगमध्ये मुकादम शेख मोबीन शेख रशीद या कर्मचाऱ्यांनी बेशिस्त वागणूक केल्याने यावल नगरपरिषद पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि यावल पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत काल रात्री उशिरा मुकादम शेख मोबीन यांच्याविरुद्ध अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला.
यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी यावल पोलीस निरीक्षक व यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेला लेखी अर्ज प्रत्यक्ष बघितला असता त्यात म्हटले आहे की,
नगरपरिषद आरोग्य विभाग ऑफिस मध्ये आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग,बांधकाम विभाग,विद्युत विभाग कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांसोबत नवरात्री सण उत्सव निमित्त काल सोमवार दि.३० रोजी दुपारी १२.३० वाजता मीटिंग घेण्यात आली असून मीटिंग मध्ये संबंधित विभाग संदर्भात कामाचे नियोजन बाबत चर्चा करण्यात आली.तरी आरोग्य विभाग बाबत शहरातील नागरिकांच्या सुव्यवस्था सोई नुसार नियोजन बाबत चर्चा चालू असता मागील महिन्याच्या गणपती विसर्जन बाबत कामाचे नियोजन ठरले होते ते पुढील प्रमाणे सफाई कर्मचारी यांची विसर्जन कुंड, विसर्जन मार्ग आणि निर्माल्यकरिता
ट्रॅक्टर ट्रॉलीचे नियोजन करणे
बाबत कार्य सोपवलेले होते परंतु संबंधित कर्मचारी मुकादम शेख मोबिन शेख रशीद यांनी मागच्या वेळेस कामचुकारपणा केलेले असल्यामुळे त्यांना महिन्या भरात किती मोकाट जनावरे गुरे-ढोरे पकडले, किती दंड वसुल केला, तसेच प्लास्टीक बंदी मोहिम किती
विक्रेत्या कडून दंड वसुल केला, अश्या विविध कार्य संबंधात चर्चा चालू होती आणि नंतर येत्या नवरात्री सण उत्सव निमित्त कामाचे नियोजन करिता चर्चा चालू असताना कर्मचारी शेख मोबिन शेख रशीद यांनी सांगितले की आताचे प्र.मुकादम कल्पना घारू हे २ दिवस झाले आलेले आहे व
तुम्ही त्यांचे ऐकतात मी सिनियर मुकादम आहे व कल्पना घारू या मला ज्युनियर आहेत.सर्व कामे मी माझ्या हिशोबाने करेन.दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता यावल पोलिस स्टेशन येथून बुरुज चौकात अनधिकृत झेंडे काढणे बाबत पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान सत्यम पाटील
याना अधिकाऱ्यांचा दूरध्वनीवर कॉल आला असता.त्यांनी सदर झेंडा काढणे बाबत मौ.कल्पना घारू यांना मुकादम शेख मोबिन शेख रशीद यांना कॉल करून
झेंडा सोबत काढणे बाबत कळविले होते. तरी सदर वेळी शेख मोबिन शेख रशीद हे स्वतः झेंडा काढणे बाबत गेले नाहीत.व सदरचे
संपूर्ण काम श्रीमती कल्पना घारु यांनी हाताळले.तरी सदर विषय बैठकीत आला असता मी माझ्या सोयीने कामे करेल. मला कुणीही
वरिष्ठ नाही.मी माझ्या मनाला पटेल ते करेल व तुला जे करावयाचे आहे ते करून घे तुझ्याने माझे काहीच होऊ शकत नाही याबाबत सत्यम
पाटील शेख मोबिन यांना उद्देशुन बोलले त्यावर सत्यम पाटील त्यांना बोलले की, “भाषा नीट वापरा हे कार्यालयीन शिस्तीना धरून नाही तुम्ही नीट भाषा वापरा. व तुम्हाला वाद घालायचा आहे का ?” त्यानंतर संबंधित कर्मचारी मुकादम शेख मोविन शेख रशीद यांनी आरोग्य
विभागात बैठकीत श्रीमती कल्पना बबलु घारू ( प्रभारी मुकादम ) व श्रीमती नेहा रजाणे ( शहर समन्वयक) या महिला कर्मचारी बैठकीत उपस्थित असताना सत्यम पाटील साहेबांना “तेरी मा की….. /मादरचोद, बह्णचोद” असे विविध घाण शब्द संभाषण केले व तु “कॅबिन के बाहर निकल तुझे देखता मैं त्यानंतर न.पा.कर्मचारी दादु धोत्रे यांनी शेख मोबिन शेख रशीद यांना कॅबिन बाहेर काढले असता
न.पा. कर्मचारी दादु धोत्रे यांच्या बाहेरील कॅबिनला दरवाजे जवळ लावलेला दगड उचलून मारण्यासाठी उगारत होता आणि जीवे मारण्याची धमकी दिली यात सत्यम पाटील तुझे काट दूंगा असे उच्चारले व त्यावेळेस न.पा. कर्मचारी दादु धोत्रे यांनी मुकादम शेख मोबिन शेख रशीद त्यांचे दोन्ही हात घट्ट पकडून त्यांच्या हातांमधील दगड न.पा.कर्मचारी कामीलउद्दीन शेख यांनी हिमकाऊन घेतले व दादु
धोत्रे यांनी मुकादम शेख मोबिन शेख रशीद यांना वरच्या मजल्या वरून खालच्या मजल्यावर घेऊन गेले असे वरील प्रमाणे घटना घडलेली असून सर्व घटना कार्यालयात असेलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरा समोर घडलेली आहे व तरी सदर कर्मचारी शेख मोबिन शेख रशीद यांनी
कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन केलेले असून महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासकीय नियमान्वये कार्यवाही व्हावी. तसेच वरिष्ठ सोबत चुकीची वागणूक व जीवे मारल्याची धमकी दिल्याबद्दल जीवाचे कमी जास्त झाल्यास शेख मोबिन शेख रशीद हे जबाबदार राहतील.तरी सदर कर्मचाऱ्यावर
गुन्हा दाखल करावा अशी विनंती
खालील सह्या करणारे यावल नगरपालिकेतील उपस्थित अधिकारी / कर्मचारी सत्यम पाटील,राजेंद्र गावंडे, शुभम भांडे दादू धोत्रे,कामीलउद्दिन शेख, कल्पना घारू,अजय मेढे,स्नेहा रजाने,ज्ञानेश्वर मगर,विजय मराठे, सचिन पाटील यांनी करून माहितीस्तव जिल्हाधिकारी जळगाव, यावल नगरपरिषद प्रशासक तथा प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.
तसेच याबाबत यावल पोलीस स्टेशनला शेख मोबीन शेख रशीद याचे विरुद्ध काल दि. 30 रोजी संध्याकाळी अदखलपात्र गुन्हा नंबर ८४७ /२०२४ दाखल झाला आहे.