Thursday, November 21, 2024
Homeजळगावयावल येथील तरुणा जवळ आढळल्या ५०० रुपयांच्या नकली, बनावट,नोटा.

यावल येथील तरुणा जवळ आढळल्या ५०० रुपयांच्या नकली, बनावट,नोटा.

यावल येथील तरुणा जवळ आढळल्या ५०० रुपयांच्या नकली, बनावट,नोटा.

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव येथील आर आर विद्यालयाच्या परिसरात बुलेट मोटरसायकलवर फिरणाऱ्या यावल येथील एका तरुणा जवळ ४८ हजार ५०० रुपयांच्या एकूण ९७ नोटा आढळून आल्याने जळगाव येथील जिल्हा पेठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याने यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचे रॅकेट आहे का..? याची चौकशी सुरू झाली आहे.

यावल येथील चेतन शांताराम सावकारे वय २७ असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव समोर आले आहे. बुधवार दि.९ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरात आर आर विद्यालयाच्या बाजूला असलेल्या गल्लीत संशयित आरोपी चेतन सावकारे हा त्याच्या ताब्यात असलेल्या बुलेट क्र.एमएचसीएल.२२२१ वर असताना त्याच्याजवळ पाचशे रुपयांच्या बनावट नकली नोटा असल्याची गुप्त खबर जिल्हा पेठ पोलिसांना मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपी चेतन सावकारी यास ताब्यात त्याच्याकडून ५०० रुपये किमतीच्या ९७ नोटा असा एकूण ४८ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करून पोलीस अंमलदार मिलिंद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील चौकशी, तपास साहेब फौजदार उल्हास सराटे हे करीत आहे. यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि कुठे कुठे नकली नोटांचे रॅकेट आहे एक चौकशी तपासा आणली जनतेसमोर येणार असे बोलले जात आहे.

काल बुधवार दि. ९ रोजी संध्याकाळी यावल शहरातून २ संशितांना यावल पोलिसांच्या मदतीने जळगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या