यावल येथील बेवारस मृत ‘गो’ मातेवर केले अंत्यविधी.
यावल दि.५ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल शहरात बोरोलेनगर भागात २ दिवसांपूर्वी एक बेवारस गोमाता मृत झाली असता त्या बेवारस ‘ गो’ मातेचा विधीवत अंत्यविधी यावल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी केला.
याबाबत अधिक माहिती अशी की २ दिवसापासून बोऱोलेनगर भागात १ गोमाता बेवारस मृत पडली होती. कुत्रे या मृत गाईचे लचके तोडायला लागले होते.सदरील परिसरातील नागरीकांनी याबाबत यावल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली असता राकेश कोलते यांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सदर गायीला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये उचलून शहराच्या बाहेर जेसीबी मशीनने खड्डा खोदून त्या ठिकाणी गाईची विधिवत पूजाअर्चा करून ‘ ‘गो’ मातेचा अंत्यविधी केला.
त्यावेळी राकेश कोलते यांच्यासह यावल नगरपालिकेचे कर्मचारी जितू चव्हाण,प्रशांत गजरे,पत्रकार भरत कोळी,नरेंद्र चव्हाण,जेसीबी ड्रायव्हर नारायण भील यांनी परिश्रम घेतले.