यावल येथे काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीचे रस्त्यावर लोकशाही मार्गाने आंदोलन.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – येथे बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर आज शनिवार दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्ग अवलंबून काळ्या फिती बांधून आंदोलन केले असले तरी यात मात्र वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.
बदलापूर येथील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यात पुकारलेला बंद मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर हा बंद मागे घेण्याची घोषणा ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, नेत्यांनी घेतला असला तरी यावल येथे यावल – भुसावळ मार्गावरील टी पॉईंटवर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्ग अवलंबून वाहतुकीस रहदारीस कोणताही अडथळा निर्माण न करता काळ्या फिती बांधून आंदोलन केले.आंदोलनात संपूर्ण महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले.