रावेर विधानसभा मतदारसंघात डॉ.नरेंद्र महाले यांचे नि:पक्ष मतदान व मतदार जनजागृती अभियान ठरत आहे कौतुकास्पद !
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवार आप- आपल्या पक्ष ध्येय, उद्दिष्ट,धोरणानुसार तसेच अपक्ष उमेदवार आपल्या नियोजनानुसार प्रचार करीत असले तरी शासनातर्फे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी तसेच मतदार जनजागृती करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले या सर्व उपक्रमात यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील डॉ.नरेंद्र महाले यांचे नि:पक्षपणे मतदार जन जागृती अभियान लक्षवेधी व कौतुकास्पद ठरल्याने नक्कीच मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार असल्याचे शासकीय यंत्रणेत बोलले जात आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे साहेब, तसेच जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील व माध्यमिक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्हाभरामध्ये मतदान जनजागृती पर कार्यक्रम सुरू आहे.महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २० नोव्हेंबर २०२४ ला असल्याने यावल,रावेर तालुक्यामध्ये प्रबोधनाचे कार्य शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत जोमाने होत आहे.यामध्ये प्रत्येक मतदारांमध्ये मतदानाची जागृती करत असताना ठीक ठिकाणी मतदानाच्या संदर्भात प्रबोधन केले जात आहे .यामध्ये मतदान करणारा प्रत्येक मतदार व त्याच्या कर्तव्या विषयी त्याला जाणीव करून दिली जात आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष गाण्यांच्या माध्यमातून,नाटिकांच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य सुरू आहे.यासाठी आज यावल येथील सरस्वती विद्यामंदिरच्या वतीने विशेष लक्षवेधी पद्धतीने भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
समाजातील विविध मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्काच्या संदर्भात जाणीव जागृती करून देत मतदार संघात ठीक- ठिकाणी व यावल शहरात भारुड सादर करण्यात आले.भारुडाचे लेखन दिग्दर्शन डॉ.नरेंद्र महाले यांनी केले. मुख्याध्यापक जी.डी.कुळकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. यामध्ये संचित कोळी,यश वारके, विनायक महाजन व डॉ.नरेंद्र महाले यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारत भारुडाचे सादरीकरण केले. यावल परिसरासह मतदारसंघात प्रबोधनाचे कार्य खूप चांगल्या व नियोजन पद्धतीने करण्यात आले त्यात त्यांना सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला याप्रसंगी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,यावल पंचायत समितीच्या बीडिओ डॉ. मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांचे सहकार्य लाभत आहे.यामध्ये
यावल तालुक्याचे मतदान प्रबोधन सेलिब्रिटी म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने डॉ.नरेंद्र महाले हे प्रबोधनाचे कार्य करत आहेत.त्यांच्यासोबत यावल येथील सरस्वती विद्या मंदिराचे मुख्याध्यापक जी.डी. कुलकर्णी सर हे सुद्धा प्रबोधनाचे कार्य करीत आहे.रावेर विधानसभा,मतदार संघामध्ये भरगोस मतदान होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथजी धनके साहेब यांचे सुद्धा योगदान लाभत आहे. लोकशाहीचे महत्त्वाचे दान म्हणजे मतदान हे करण्यासाठी प्रबोधनाचे समाजसेवेचे काम रावेर मतदारसंघात अत्यंत कौतुकास्पद पद्धतीने सुरू आहे.सरस्वती विद्यामंदिर यांच्या पुढाकाराने सामाजिक कार्याची जाणीव होत आहे. यात प्रामुख्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून रावेर विधानसभा मतदार संघामध्ये सरस्वती विद्यामंदीराचे उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांची महत्त्वाच्या भूमिकेत मतदारांमध्ये जनजागृती करताना त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.