Thursday, November 21, 2024
Homeगुन्हारेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली दोघं युवकांची लाखो रुपयात फसवणूक !

रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली दोघं युवकांची लाखो रुपयात फसवणूक !

रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली दोघं युवकांची लाखो रुपयात फसवणूक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रेल्वेत नोकरीला लावून देण्याच्या नावाखाली धरणगावातील दोन युवकांची २० लाखांत फसवणूक करण्यात आली आहे. मोहंमद जुबेर मोहंमद युसुफ (२७) आणि शेहजाद खान शकील खान (२४, सारया मोहल्ला, धरणगाव) अशी फसवणूक झालेल्या दोघांची नावे आहेत. हि घटना धरणगाव शहरात घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सतीश गोकुळ पाटील, मनीषा सतीश पाटील, प्रमिला गोकुळ पाटील (जुनोवने ता. अमळनेर), प्रवीण गोकुळ महाले (पारोळा), राम नारायण नेवाळकर, अरुण (पूर्ण नाव माहीत नाही) (दोन्ही नाशिक) तसेच रामकुमार (पूर्ण नाव माहीत नाही) (रा. दिल्ली) या सर्वांनी संगनमताने भारतीय रेल्वे खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. तसेच मोहंमद जुबेर यांच्या नावाची खोटे बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर रेल्वे मंत्रालय नावाचे खोटे बनावट शिक्के मारले. तसेच आरआरसीबी इंडियन रेल्वे, असा खोटा बनावट ई-मेल पाठवत मोहंमद यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोहंमद जुबेर यांच्याकडून वेळोवेळी एकूण १३ लाख रुपये घेतले.या घटनेच्या दोन-तीन महिन्यांनंतर शेहजाद खान शकील खान या तरुणाकडूनही रेल्वेत नोकरीला लावून देण्याच्या नावाखाली या सातही आरोपींनी ७ लाख रुपये उकळले. परंतु त्याला कोणतीही नोकरी लावून दिली नाही व पैसे परत केले नाहीत.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहंमद जुबेर आणि शेहजाद खान यांनी धरणगाव पोलिसांत धाव घेतली. आरोपींना त्यांच्या बँक खात्यात पैसे भरण्याच्या पावत्या, संशयितांना पैसे दिल्याचे फोटो, व्हिडीओ चित्रीकरण तसेच आरोपींनी फिर्यादीस रेल्वेच्या नावाचे खोटे बनावट तयार केलेली ऑर्डर प्रत व इतर कागदपत्रही पोलिसांत सादर केले. त्यानंतर पोलिसांनी या सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुधीर चौधरी हे करीत आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या