वरणगावला शिवसेनेत असंख्य मुस्लिम तरुणांसह महिलांचा तसेच आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी- शहरातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी यांच्यासह तरुण व कठोरा येथील मुस्लिम बांधव आणि प्रभाग क्रमांक ७ व ८ मधील असंख्य हिंदु- मुस्लिम महिलांनी मंगळवारी दि. २१ सायंकाळी मुस्लिम समाजाच्या हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला.
व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, महिला जिल्हा संघटिका नंदा निकम, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, सय्यद हिप्पीसेठ, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुका संघटक सुरेश चौधरी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष हमीद खान, तालुका संघटीका मनीषा पाटील, नयन सुरवाडे, प्रल्हाद माळी यांची उपसथिती होती.
सुरवातीला नंदा निकम, सुरेश चौधरी, हमीद खान, अफसर खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात महाजन सर यांनी सांगितले की, शिवसेनेचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी भरपूर लोकोपयोगी शासनाच्या योजना आणल्या, त्यात लाडकी बहीण योजना ही सर्वात लोकप्रिय योजना ठरली. या योजनेचा लाभ हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या समाजातील सर्वांसाठी झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे कार्य पाहून त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन आज आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, मुस्लिम समाजातील तरुण महिला खूप मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले.
शिवसेनेत यांनी केला प्रवेश –
१) इरफान शहा, युसुफ शहा, सलीम शहा, शब्बीर शहा, आयुब शहा, आरिफ शहा, जुबेर शहा, तजेल शहा, मासूम शहा, हिसाब शहा, समीर शहा, निसार शहा, लाला शहा, अकबर शहा, कादर शहा, दगू शहा सय्यद उमर यांच्यासह प्रभाग क्रमांक सात आणि आठ येथील ५० ते ६० हिंदू मुस्लिम महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.
आम आदमी पार्टीचे पार्टीचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फिरोज खाटिक, अशफाक खाटीक, एजाज खतिक, अर्शद खाटीक, तोसिफ खाटीक, अमीन खाटीक, इब्राहिम सेख, युनूस ठेकेदार यांनी शिवसेनेत प्रवेश केला
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका उपसंघटक प्रशांत पाटील, युवा तालुकाप्रमुख राहुल वंजारी, शहर संघटक दुर्गेश बेदरकर, विकी मोरे, गोली भोई यांनी तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी यांनी केले आभार सुरेश चौधरी यांनी मानले.