Thursday, November 21, 2024
Homeजळगाववरणगाव येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न.

वरणगाव येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न.

वरणगाव येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न.

वरणगाव सिव्हिल सोसायटी मार्फत दिनांक 01 सप्टेंबर रोजी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा नागेश्वर महादेव मंदिर वरणगाव येथे आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी कला शिक्षक श्री दामोधर पद्माकर नेवे सर , श्री दत्त हायस्कूल, चिखली बुद्रुक तालुका यावल यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेची सुरुवात मयुरी पवार यांनी गणेश वंदना सादर करत झाली.

 


कार्यशाळेचे सूत्रसंचलन डॉ अनिल हरी शिंदे यांनी केले .तसेच वरणगाव सिव्हिल सोसायटीचे प्रमुख मार्गदर्शक डॉ राहुल भोईटे यांनी कला शिक्षक श्री नेवे सर यांचा सत्कार केला.
याप्रसंगी लहान मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी “गुड टच, बॅड टच” या संवेदनशील विषयावर नाटिका सादर करण्यात आली.
यामधे वरणगाव सिव्हिल सोसायटीच्या महिला सदस्य सर्वस्वी सौ श्रद्धा चौधरी, डॉ अनुजा भोईटे, डॉ अंकिता शिंदे, सौ नंदिनी माळी, सौ समीक्षा माळी, सौ वैशाली चौधरी, सौ सोनाली पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
यामाध्यमातून समाजात वाईट प्रवृत्ती कडून कशा प्रकारे लैंगिक शोषण होते ते दाखविण्यात आले. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना दररोज शाळेतून घरी आल्यावर बोलते केले पाहिजे हा संदेश दिला.
यानंतर प्रत्येक सहभागी बालकास शाळू मातीचा गोळा व पृष्ठ देण्यात आले व नेवे सर यांच्या मार्गदर्शन नुसार बालगोपालांनी सुंदर सुबक अशा गणेश मूर्ती तयार केल्या होत्या .

 


साई ज्वेलर्सचे संचालक श्री किशोर शेठ सोनार यांच्यामार्फत उदात्त हेतूने कार्यशाळेस शाळू माती व प्रथम तीन पारितोषक तसेच तीन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कार्यशाळेत एकूण 150 बालकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे पालकांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सिव्हिल सोसायटी सदस्य गोपाळ गावंडे , श्रीकांत माळी , निलेश झोपे
, हेमंत पाटील , राहुल सोनवणे, कमलेश येवले , राजेश टी चौधरी , रामचंद्र पाटील , आर एन पाटील , विनोद पाटील , ॲड. किशोर पाटील , विशाल सोनार आदींनी परिश्रम घेतले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या