वरणगाव येथे श्री सत्यसेवा संघटनेतर्फे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
वरणगाव येथे श्री सत्य सेवा संघटना जळगाव पश्चिम महाराष्ट्र व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक 9 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे .
यापूर्वी जाडगाव वरणगाव ,तांदळवाडी सुनोदा ‘ बोरखेडा येथील शिबिरात या पेशंटचे ऑपरेशन झाले आहे त्यांची फेर तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे .
पेशंटची संपूर्ण व्यवस्था सत्यसाई सेवा संघटना व तुलसी आय हॉस्पिटल तर्फे मोफत करण्यात आलेली आहे ,
तरी इच्छुकांनी 9 सप्टेंबर रोजी सत्यसाई सेवा समिती हाल स्वामी समर्थ मंदिराजवळ विष्णू प्लाय च्या मागे वरणगांव या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन सत्यसेवा संघटनेतर्फे करण्यात आली आहे .