विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी, नागरिकांच्या समस्या जाणून घ्या. :
विनोदजी मोरडीया.
यावल दि.२१ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची नियोजनबद्ध जय्यत तयारी सुरू झाली असून शक्ती केंद्रप्रमुखांनी आपापल्या गावातील, शहरातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्याच्या त्यांच्या काय समस्या, अडीअडचणी आहेत त्या जाणून घ्या अशा सूचना गुजरात राज्यातील पूर्व मंत्री विनोदी मोरडिया यांनी शक्ती प्रमुखांना दिल्या.
आज शनिवार दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शक्ती प्रमुख यांची महत्त्वपूर्ण बैठक गुजरात राज्यातील पूर्व मंत्री विनोदजी मोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.रावेर विधानसभेच्या तयारी साठी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आपल्या बूथ वरती जाऊन कसे काम करायचे..? काय काय कामे करावे..? इत्यादी माहिती सांगताना मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या काय काय समस्या आहेत हे जाणून घ्यावे तसेच काम करतांना आपल्याला काय अडचणी येतात… या सर्व वरीष्ठ स्तरावर तात्काळ पोहचाव्यात जेणे करुन येणाऱ्या अडीअडचणी समस्या आपल्या माध्यमातून पुर्ण करण्याचा प्रयत्न करूया अशा सुचना त्यांनी सर्व कार्यकत्यांना केल्या या वेळी उपस्थित मान्यवर सुरेश धनके ,
प्रदिप पाटील,शरद महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,भाजपा हरलाल कोळी,
जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत,ता.सरचिटणीस विलास चौधरी,ता.सरचिटणीस गणेश नेहेते,नितीन चौधरी,नारायण बापु चौधरी,भाजपा जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष नितीन राणे,
हेमराज फेगडे,डॉ.नरेंद्र कोल्हे,
नितीन चौधरी,नागेश्वर साळवे,राहुल बारी,पिंटू तेली,दिपक चौधरी,पंकज पाटील,श्याम महाजन,भरत चौधरी,
अतुल भालेराव,पी.डी.चौधरी, पी.एस.सोनवणे सर,सागर कोळी ता अध्यक्ष युवा मोर्चा,भुषण नेहतेजिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा शरद कोळी,मुकेश कोळी,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ,सविता भालेराव,सौ.सरला कवडीवाले, शहर सरचिटणीस योगेश चौधरी, भरत धनगर,राजू पाचपांडे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.