विनयभंग करणाऱ्यास त्वरीत अटक करा : भटके विमुक्त महिला व आर.पी.आय चे निवेदन !
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनीधी – येथील श्री मॉल व श्री किराणा दुकानाचे मालक राजेंद्र जैन याला त्वरित अटक करण्यात यावे.व कडक शासन व्हावे या मागणीसाठी दि 15 शुक्रवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) व भटके विमुक्त आदिवासी महिला आघाडी तर्फे वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. वरील आरोपी यास अटक करण्यात यावी आणि कडक शासन व्हावे अन्यथा लोकशाही मार्गाने तिर्वआंदोलन करण्यात येईल असे वरील दोघ सघटणा मार्फत करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि.11 रोजी अप्ल्वयीन मुलगी आणि तिच्या आई वडीलांवर तसेच नातेवाईकांवर पैशांच्या जोरावर सदर आरोपी याचेकडून त्याची पत्नी व नातेवाईकांमार्फत दबाव आणला जात असून सदर आरोपी हा धनदांडगा व उच्च जातीचा व धर्माचा असल्याने आपणाकडून त्याला जाणूनबुजून अभय दिले जात असल्याने तो मोकाट फिरत आहे आणि तरी देखील अदयाप त्याला अटक करण्यात आलेली नाही. आम्ही भटके विमुक्त बहुजन वंचित महिला संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट )तर्फे निवेदन देण्यात येते की, सदर आरोपी हयास त्वरीत अटक करण्यात यावी आणि पिडीत मुलगी व तिच्या नातेवाईकांना दमदाटी व धमकी देणा-या विरूध्द देखील गुन्हा दाखल करावा तसेच सदर आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याचे दृष्टीने या गुन्हयाचा तपास पोलिसांनी जलद गतीने करावा,सदर आरोपीस अटक केली नाही तर मात्र आमच्या संघटने मार्फत सामूहिक उपोषण व इतर मार्गाचे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही संघटनांनी केला आहे .
भटके विमुक्त बहुजन वंचीत महिला संघटनेच्या सदस्या अनिता पवार,सोनिया लोंढे सुमिना भुसांडे,सुमित्रा भुसांडे,नलिनी जाधव, सीता गायकवाड,दिपाली भुसांडे,ज्योति भुसांडे,कमल गायकवाड,आर पी आय चे मोहन सोनवणे,आम आदमी पार्टीचे भिमराव निकम इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.