विल्हाळे परिसरात राखेच्या साठ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – विल्हाळे परिसरात दीपनगर मुळे प्रदूषण होऊन नुकसान तर होत आहे परंतु राखेचा साठा ठीक ठिकाणी असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला हानी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे .
दिपनगरची राख विल्हाळे शिवारात सोडल्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रदूषण वाढले आहे .त्यातच गावातील व काही बाहेरच्या नागरिकांनी खाजगी शेतीत व सरकारी शेतीत सुद्धा राखेचा साठा केल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होत आहे . कारण सदरची राख हे या ठिकाणाहून वाहतूक केल्याने व हवेमुळे पिकांवर राखेचा थर बसत आहे या कारणाने शेतीचे नापिकी वाढत असून शेतकरी हवालदिल झाला आहे .
तसेच या राखेच्या साठया ठिकाणी अनेक रस्ते सुद्धा बंद झालेली आहे .शेती रस्ते गाव रस्ता सुद्धा या साठ्यामुळे बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे .तरी याबाबत शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी नितीन पाटील , सोपान पाटील ,गणेश पाटील, संदीप चौधरी ,शिवा रोटे , त्रंबक पाटील , घनश्याम पाटील , महेंद्र पाटील आदी शेतकऱ्यांनी केली आहे .