विविध प्रकरणातील व बेवारस २५ दुचाकी मालकांना दुचाकी नेण्याचे यावल पोलिसांचे आवाहन.
यावल दि.१७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी प्रतिनिधी ) येथील पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात विविध गुन्हे, अपघात प्रकरणातील व बेवारस स्थितीत मिळून आलेल्या तब्बल २५ दुचाकी जमा आहेत.या सर्व २५ दुचाकी गेल्या १० ते १५ वर्षापासून पोलीस ठाण्यात पडून आहेत.म्हणून यावल पोलिसांनी या दुचाकींच्या विल्हेवाट संदर्भात कार्यवाही सुरू केली असुन सदर दुचाकींच्या मालक व त्याच्या वारसदारांनी आवश्यक कागदपत्र पोलिस ठाण्यात सादर करून ८ दिवसाच्या आत दुचाकी आपल्या ताब्यात घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
यावल पोलीस कार्यक्षेत्रातील विविध गुन्हे,अपघात प्रकरणी व बेवारस स्थितीत मोठ्या प्रमाणावर वाहन मिळून आलेले आहे.ते पोलीस स्टेशन आवारात गेल्या दहा-पंधरा वर्षापासून २५ दुचाकी बेवारस म्हणून जमा आहेत.या दुचाकींची विल्हेवाट आता पोलिसांच्या वतीने लावली जात आहे.म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर व हवालदार शांताराम तळेले यांच्या वतीने सदर बेवारस दुचाकी मालकांना आव्हान करण्यात आले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की सदर अपघातात किंवा इतर कारणाने पोलीस स्टेशनमध्ये पडलेल्या या दुचाकीच्या मालक किंवा त्यांच्या वारसांनी यावल पोस्टेला येवुन दुचाकी आपली असल्याची खात्री करीत ज्यांची असेल त्यांनी त्याचे कागदपत्र सादर करून त्या दुचाकी घेऊन जाव्या असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसाच्या आत जर कोणी दुचाकी घेऊन गेले नाही तर या संपुर्ण दुचाकी बेवारस समजून शासकीय नियमानुसार त्यांची विल्हेवाट लावली जाईल असे पोलिसांनी जाहीर केले आहे.