बॅनरने भुसावळ सजले ; खेळाडू मध्ये उत्साहाचे वातावरण
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील आई फाउंडेशन अंतर्गत छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी आयोजित राणी लक्ष्मीबाई पहिली मुली व महिलांचे ऑल इंडिया बॉक्सिंग टूर्नामेंट ६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान शहरातील महात्मा गांधीं यांच्या पुतळ्या जवळ कोरोनेशन क्लब भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
सहा वेळेस विश्वविजेती ऑलिंपिक विजेता एमसी मेरी कोम या भुसावळ शहरात प्रथमच ६ नोव्हेंबर रोजी येत आहे. त्यांचे शहरातील टिव्ही टावर मैदानावर आगमन होणार आहे. त्याठिकाणी भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य मिरवणूक रॅली काढुन जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरा पासून पांडुरंग टाकीज, बाजारपेठ पोलीस स्टेशन, लोखंडी पुलाखालून शहर पोलीस स्टेशन, महात्मा गांधींचा पुतळा ते डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मिरवणूक संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष वेनोपी नायर मध्य रेल्वे हे उपस्थित राहणार असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी व भुसावळ रेल प्रबंधक श्रीमती पांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकेडमीचे अध्यक्ष नरेंद्र मोरे, विशाल सपकाळे, गणेश वाघोदे, नितेश तायडे, कृष्णा सोनी, समाधान बाविस्कर, बबलू नेतकर, आई फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत पाटील, अभय आखाडे, किरण पाटील, प्रीतम टाक, डॉक्टर सुवर्णा गाडेकर, वंदना सोनवणे, राजश्री सोनवणे , छाया पाटील परीश्रम करीत आहेत.