वैशालीताई सुर्यवंशी यांची खा. संजय राऊत यांच्यासोबत चर्चा !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या सोबत वैशालीताई सुर्यवंशी यांनी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली.
आज खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या व पार्श्वभूमिवर इच्छुक उमेदवारांशी विस्तृत चर्चा करतांनाच मतदारसंघनिहाय आढावा घेतला. यात पाचोरा-भडगाव मतदारसंघातून शिवसेना-उबाठा पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी निश्चीत असणाऱ्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी देखील त्यांच्या सोबत चर्चा केली. गत लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मतदारसंघातून तब्बल 80 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली असून वैशालीताई या अतिशय परिश्रमपूर्वक शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचत असून त्या येथून निवडणूक लढवून बाजी मारतील असे चित्र आहे. या पार्श्वभूमिवर आजची चर्चा ही अतिशय महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी जिल्ह्यातील पाच ते सहा जागा आपला पक्ष लढविणार असून यात पाचोरा-भडगावचा समावेश असण्याचे स्पष्ट केले. यामुळे विरोधक कितीही वावड्या उठवत असले तरी महाविकास आघाडीकडून शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी याच उमेदवारी करणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.