Thursday, March 13, 2025
Homeगुन्हाव्हायरलची धमकी देत विवाहितेवर अत्याचार ; गुन्हा दाखल!

व्हायरलची धमकी देत विवाहितेवर अत्याचार ; गुन्हा दाखल!

व्हायरलची धमकी देत विवाहितेवर अत्याचार ; गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – फोटो व्हायरल करण्यासह पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत ३२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. हा प्रकार ८ जुलै २०२२ ते १२ जून २०२३ यादरम्यान एका हॉटेलमध्ये घडला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, विनोद रामचंद्र पाटील (रा. श्रावणनगर, काशीनाथ नगरजवळ) याच्याविरुद्ध १० फेब्रुवारी रोजी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील एका ३२ वर्षीय विवाहितेशी विनोद पाटील याची ओळख झाली. त्याने जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये या विवाहितेवर अत्याचार केला. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी व फिर्यादीच्या पतीकडून वेळोवेळी पैसेही उकळले. तसेच पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तो विवाहितेचा छळ करीत राहिला. तपास पोउनि प्रिया दातीर करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या