Thursday, November 21, 2024
Homeगुन्हाशहरातील प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात २६ वर्षीय महिला रुग्णाचा वार्ड बॉयनेच केला विनयभंग...

शहरातील प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात २६ वर्षीय महिला रुग्णाचा वार्ड बॉयनेच केला विनयभंग !

शहरातील प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात २६ वर्षीय महिला रुग्णाचा वार्ड बॉयनेच केला विनयभंग !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात २६ वर्षीय महिलेवर नियमित उपचार सुरु होते. येथील वार्ड बॉयने त्या महिलेचा रुग्णालयात विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात एक २६ वर्षीय महिला नियमित उपचारासाठी आली असता रुग्णालयात डॉक्टर नसताना एका वार्ड बॉयने त्या महिलेला कुठल्याही उपचाराची गरज नसताना तिला जनरल वार्डमध्ये घेवून जात दि. १४ नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० वाजे दरम्यान चुकीचे कृत्य केल्याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात एका वार्ड बॉय विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोहेकॉ.वंदना राठोड हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या