Thursday, November 21, 2024
Homeजळगावशिक्षक हे कोणाचे गुलाम नाहीत, युवा पिढीवर संस्कार आणि भावी पिढी घडविणारे...

शिक्षक हे कोणाचे गुलाम नाहीत, युवा पिढीवर संस्कार आणि भावी पिढी घडविणारे आधारस्तंभ आहेत : डॉ. कुंदन फेगडे.

शिक्षक हे कोणाचे गुलाम नाहीत, युवा पिढीवर संस्कार आणि भावी पिढी घडविणारे आधारस्तंभ आहेत : डॉ. कुंदन फेगडे.

खंडेराववाडीत शिक्षक गुरुजनांचा भव्य स्नेह मेळावा संपन्न.

यावल दि.२९ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  शिक्षक हे कोणाचेही गुलाम नाहीत तर ते युवा पिढीवर संस्कार घडवणारे आणि भारताची भावी पिढी घडवणारे आधारस्तंभ आहेत असे प्रतिपादन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे यांनी व्यक्त केले.
आश्रय फाउंडेशन यावलच्या वतीने आज फैजपूर येथे खंडोबा वाडी देवस्थान परिसरात रावेर – यावल तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्नेहपूर्ण मेळावा आणि सत्काराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक दिलीप पाटील होते.होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प.पू.पवनदास महाराज,पी.एस.सोनवणे सर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिक्षिका अश्विनी कोळी ( न्हावी ), मुख्याध्यापक दिलीप पाटील (अभोडा) आणि जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक जितेंद्र पाटील (मोरगाव) आणि दीपक चव्हाण यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास डॉ. पराग पाटील,डॉ.भरत महाजन,डॉ. सोहन महाजन,डॉ.विलास पाटील, संदिप भारंबे,कन्हैया चौधरी,शुभम तांबट,राम शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित सर्वच मुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीशा कोळी यांनी केले तर सौं.अश्विनी कोळी यांनी आभार मानले.
कार्यक्रमास रावेर तालुका भाजपा चिटणीस जितेंद्र चौधरी सर यांच्या पत्नी तथा लहान वाघोदे येथील प्रथम लोक नियुक्त सरपंच तथा रावेर तालुका सरपंच संघटना सचिव सौ.दिपाली जितेंद्र चौधरी यांच्यासह यावल – रावेर तालुक्यातून मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आश्रय फाउंडेशनचे डॉक्टर व इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेऊन स्नेहभोजन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या