संकट मोचक श्री गणरायाच्या स्थापनेबरोबर भूमातेच्या कुशीत वृक्षदेवतेची स्थापना करून वातावरण गणेशमय करावे.– सुरेंद्रसिंग पाटील
भुसावळ ( प्रतिनिधी) आज गणेश चतुर्थीच्या पूर्व संध्येला भुसावळ तालुक्यातील खडका येथे सामाजिक कार्यकर्ते भरत टेलर व दीपक बोरणारे यांच्या घराजवळ रस्त्यावर पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील खडका गावचे पोलीस पाटील दारासिंग पाटील सामाजिक कार्यकर्ते रणजीत सिंग राजपूत चरणसिंग चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी खडका गावचे पोलीस पाटील दारासिंग पाटील यांनी सर्व खडके गावातील प्रत्येक घरातील सदस्यांनी संगोपना सहित वृक्षारोपण करावे अशी विनंती केली. तसेच रणजीत सिंग राजपूत यांनी भरत टेलर व दीपक बोरणारे यांच्या मागणीनुसार आज गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला आमच्याकडे गावात यशस्वीरित्या पार पडला. पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्र सिंग पाटील यांनी उद्यापासून गणेशोत्सवाचे आगमन होत असून आपले आराध्य दैवत संकटमोचन गणेशजीच्या स्थापनेबरोबर भूमातेच्या कुशीत वृक्षदेवतेची स्थापना करून वातावरण गणेशमय करावे अशी विनंती केली . आपल्या प्रत्येक घरामध्ये सरस्वती लक्ष्मी व गणेशजी यांची एकत्र असलेली प्रतिमा असते आपण प्रत्येक जण त्याची मनोभावे पूजा करत असतो. देवी सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. विद्या म्हणजे नुसते पुस्तके ज्ञान नसून आपण करीत असलेल्या व्यवसायात नोकरीत आपापल्या परीने निपुण असतात ही देवी सरस्वतीची कृपा असते. तसेच त्या त्याद्वारे आपण लक्ष्मी प्राप्त करत असतो लक्ष्मी म्हणजे पैशाची निर्मिती करून आपला घर संसार तसेच घर गाडी बंगला जे काही असेल त्याचा उपभोग घेत असतो परंतु
याबरोबर गणेश जी म्हणजे गणेशमय वातावरण म्हणजे पैशाऐवजी ज्याचे शरीर निरोगी आहे तोच खरा सुखी आहे म्हणून गणेशमय वातावरणाची निर्मिती आज रोजी आपले निसर्गनिर्मित नैसर्गिक संपत्ती कमी होत असल्याने आपणास भूकंप ढगफुटी अनेक प्रकारचे आजार काही आजारांमुळ आपणास घराबाहेर निघता येत नाही यासारख्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे तोंड द्यावे लागत आहे आपणास कृत्रिम श्वासाऐवजी नैसर्गिक श्वासाचे गरज आहे त्यांच्यासाठी संगोपणासहित विविध प्रकारचे झाडे लावणे गरजेचे आहे तसेच आपण आपल्या आराध्य दैवत गणेशजींना स्थापना वेळी पाच फळ व विविध प्रकारचे दूर्वा फुलं अर्पण करत असतो ज्याच्याकडे घरी किंवा शेतात जागा असेल त्यांनी पाच फळांची झाडे लावून फुलांची झाडे सुद्धा लावावीत व अन्नधान्याबरोबर फळफलंयुक्त करून समृद्ध भारत घडवावा. अशी विनंती पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्र सिंग पाटील यांनी कार्यक्रमाच्या वेळेस केली.