Thursday, November 21, 2024
Homeजळगावसंविधान जागर यात्रेचे जळगावात उत्साहात स्वागत

संविधान जागर यात्रेचे जळगावात उत्साहात स्वागत

संविधान कुणीही बदलू शकत नाही मान्यवरांचे प्रतिपादन

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधान अमृत महोत्सव निमित्त संविधान जागर यात्रा 2024 चे आगमन 3 सप्टेंबर रोजी जळगावात झाले.
यानिमित्त दापोरेकर मंगल कार्यालय येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंचावर राजेंद्र गायकवाड, योजना ठोकळे, आकाश अंभोरे, ॲडवोकेट वाल्मीक निकाळजे, ॲडवोकेट विजय गव्हाळे, आमदार राजू मामा भोळे, नागसेन दादा, उज्वला बेंडाळे, स्नेहा भालेराव, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर आदी उपस्थित होते.
संविधानाचे पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.योजना ठोकळे यांनी माहिती देताना संविधान जागर यात्रेचा हा 27 वा दिवस आहे. लोकसभेची निवडणूक खोटा नेरेटीव पसरवून संविधान बदलणार, मनु स्मृतीचे राज्य येणार असे खोटे पसरविले गेले. संविधान कोणीही बदलू शकत नाही हे सांगण्यासाठी ही संविधान जागर यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संविधान जागर यात्रा 2024 च्या पुस्तिकेचे मंचावरील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.आकाश अंभोरे यांनी प्रास्ताविकात राजकीय पक्ष संविधान बदलले जाणार अशी अफवा पसरवीत आहेत. संविधानाची आत्मा असलेल्या उद्देशिकेत बदल करण्याचे पाप कुणी केले ? माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी मिसा कायदा लावला. एक हाती अधिकार घेतले. हा संविधान हत्येचा पहिला प्रयत्न होता. दोन प्रकारच्या उद्देशिका उपलब्ध आहेत. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली व दुसरी इंदिरा गांधी यांनी बदल केलेली असे सांगितले.ॲडवोकेट विजय गव्हाणे यांनी कशाप्रकारे भारताचे संविधान बदलण्याचं खोटं पसरविण्याचे कारस्थान चालू आहे ते सांगितले. भारत ज्या संविधानाच्या पायावर उभे आहे. वाचनालयात पुस्तके वाचणारे संविधान वाचत नाहीत. संविधानाबद्दलचे अज्ञान असल्याने त्याचा गैरफायदा घेतला जातो. संविधान बदलले जाऊ शकत नाही. संविधान युगपुरुषाने लिहिले आहे. संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते.राज्यघटनेत घटनादुरुस्तीची तरतूद आहे. दुर्दैवाने राजकीय पक्ष आपली एकाधिकारशही बसवण्यासाठी या तरतुदीचा उपयोग करतात. मूलभूत हक्क स्वातंत्र्याला धक्का लावता येणार नाही. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी रूपात हुकूमशाही लादली होती. अकरा लाख लोक तुरुंगात टाकले होते. मूलभूत हक्क कमी केले. देशात स्वातंत्र्यानंतर 28 वर्षातच कॉंग्रेसने हुकुमशाही आणली. 42 व्या घटनादुरुस्तीने आपली हुकूमशाही शिक्कामोर्तब केली.

जनसंघ पक्षाचे रूपांतर जनता पार्टीत झाले. त्यांनी दंड थोपटले. लोकसभेत काँग्रेस हरली. जनता पक्षाचे सत्ता आली . त्यांनी 44 वी घटना दुरूस्ती करून 42 वी घटनादुरुस्ती निकामी केली. आपण 1947 ला स्वातंत्र्य झालो. दुसरे स्वातंत्र्य जनसंघाने दिले. मी काँग्रेसला विरोध करायला नाही आलो किंवा भाजपला मतदान करा हे सांगण्यासाठी नाही आलो, तर वस्तूस्थिती सांगण्यासाठी आलो.
1950 ला घटना अमलात आली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत केले. संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र सुद्धा नव्हते. जनता पक्षाच्या पाठिंब्याने व्ही. पी. सिंग सरकार सत्तेत आले. या सरकारने डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न किताब दिला. बाबासाहेबांचे तैलचित्र संसदेत लावले. बौद्ध धर्मीयांसाठीच्या सवलती सुरू केल्या असे प्रतिपादन केले.नागसेन दादा यांनी मार्गदर्शन करताना नऊ ऑगस्ट रोजी महाड येथून ही यात्रा सुरू झाली आहे. 6500 किलोमीटर प्रवास आणि 36 जिल्ह्यात ही यात्रा पोहोचणार आहे. आरक्षण रद्द केले जाणार घटना बदलली जाणार असा निरेटीव्ह तयार / खोटा अपप्रचार केला गेला. संविधान कोणीही बदलऊ शकत नाही. एकदा बाबासाहेबांनी लिहिलेले थॉट्स ऑन पाकिस्तान वाचा म्हणजे अनेक गोष्टी स्पष्ट होतील. असे मत व्यक्त केले.राजेंद्र गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विचारांची लढाई विचारांनी लढत आहे. घटना लिहिलेल्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल का आणले ? लोकसभा निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्यासाठी काँग्रेसला काय पोटशूळ आला होता त्याचा विचार व्हायला पाहिजे असे सांगितले.वाल्मीक निकाळजे यांनी आपल्या मार्गदर्शनात बाबासाहेब म्हणतात प्रथम मी भारतीय आणि अंतिमही मी भारतीय आहे. हा देश पुन्हा सोने की चिडिया झाला पाहिजे हे बाबासाहेबांचे स्वप्न आहे. देशात सध्या जाती ,धर्म, संविधान, आरक्षण, शेतकरी, तरुण याआधावर देश तोडण्याचा आणि फोडण्याचा प्रयत्न होत आहे. साम्राज्य वाद्याकडून हा देश घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे.

गैरसमज सर्वात मोठा शत्रू आहे. गैरसमज निर्माण करून देशाचे एकसंघ घर तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांनी त्यांचे पक्ष वाढविण्यासाठी आपले पक्ष संपवले आहे. आंबेडकरी चळवळीत फूट पाडली. अल्पसंख्यांकांची वोट बँक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक वाचा. अफगाणिस्तान बुद्ध राष्ट्र होते. अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन केले तर हे आपल्या उरावर बसतील. हिंदू व आपल्यात मतभेद आहेत पण कुठे विचार विनय करण्यासाठी जागा शोधल्या पाहिजे. हिंदु तुम्हाला निवडून आणू शकतात. पुणे येथील आंदोलनात काही लोकांनी निळे झेंडे हाती घेतले संविधानही हाती घेतले आणि त्यांचे सर जुदा असेही बोलले. आंबेडकर वाद्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू आणि बौद्धांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

मुस्लिम आधी मुस्लिम आहेत मग भारतीय आहे. गजवा हिंद घातक आहे. असे सांगितले.आमदार राजू मामा भोळे यांनी संविधान यात्रेला पाठिंबा दिला. राजकारण गलिच्छ प्रकारचे झाले आहे. सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो हे संविधानामुळेच शक्य आहे. काँग्रेसने 65 वर्षांपासून गरिबी हटाव चा नारा दिला. पण मोदी यांनी दहा वर्षात गरीबींचे संख्या कमी केली त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले. जे सत्य आहे ते मांडले गेले पाहिजे असे सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या