रावेर विधानसभा मतदारसंघात विविध समस्या,अडी – अडचणी सहन करून मतदान करणारे आदर्श मतदार….
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या रावेर विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरात ९० टक्के अडीअडचणी,विविध समस्या असताना सुद्धा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाचे प्रभाव संपन्न उमेदवार राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून कधीही आपल्या विरोधकावर ” सत्ताधारी पक्षावर आरोप – प्रत्यारोप ” करीत नाही,त्याच प्रमाणे मतदार संघातील बहुसंख्य सुज्ञ मतदार सुद्धा विविध समस्या,अडी- अडचणी मुकाट्याने मजबुरीने सहन करून दर पंचवार्षिक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान करून आपला आदर्श दाखवीत गप्प बसत असल्याने रावेर लोकसभा व विधानसभा मतदारसंघाचा ठोस असा सर्वांगीण विकास झाला नाही.अशी प्रत्यक्ष वस्तुस्थिती असताना सुद्धा रावेर विधानसभा मतदार संघातून राजकीय पक्षाचा उमेदवार निवडून येतो याला मतदारसंघाचे दुर्भाग्य म्हणावे की राजकीय पक्षाचा विकास म्हणावा..? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि त्या आधी सुद्धा अधून मधून राजकारणात सत्ताधारी यांच्यासह विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना लाजिरवाणी पद्धतीने टीका केली होती आणि आहे.यात मात्र काही आजी,माजी प्रमुख, मंत्र्यांनी नेत्यांनी सुद्धा आरोप प्रत्यारोप करून तोंड सुख घेतले आहे.परंतु या काही मंत्री,नेत्यांनी गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या कालावधीत कधीही यावल रावेर तालुक्यातील म्हणजे रावेर लोकसभा व विधानसभा मतदार संघातील बंद पडलेल्या उद्योगांबाबत,विविध समस्यांबाबत लोकसभा व विधानसभेत आवाज काढलेला नाही.उदाहरणार्थ जे.टी. महाजन सहकारी सूतगिरणी, मधुकर सहकारी साखर कारखाना यांना आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात कोणीही कोणत्याही प्रकारे हालचाली केलेल्या नाहीत..? जिल्हा बँकेचे तत्कालीन चेअरमन यांनी मधुकर कारखान्याला हंगामी मदत पुरेशी न केल्याने कारखाना बंद पडला याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधीने आज पर्यंत सुद्धा आवाज का उठविला नाही..? संपूर्ण जळगाव जिल्ह्यात महसूल मंडळाला पिक विमा मंजूर झाला परंतु एकमेव यावल महसूल मंडळ वंचित राहिल्याने त्याबाबत कारवाई केव्हा होणार..? पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत रावेर विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयाचा मोठा घोटाळा घोळ करण्यात आला त्यांना कोणाचे आशीर्वाद होते..? त्याबाबत कोणीही का आवाज उठविला नाही..? यावल कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात अजूनही खेडा खरेदी सुरू आहे, बाजार समितीच्या आवारात लिलाव पद्धतीने सर्व शेती उत्पादित माल खरेदी का केला जात नाही..? शेतकऱ्यांचा माल व्यापारी खरेदी करताना मापात पाप करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यावर सुद्धा दखल घेतली जात नसल्याने आणि यावल शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आमदाराच्या एका पदाधिकाऱ्याने काही कामे बोगस निकृष्ट प्रतीची करून मलिदा मारल्याने तसेच, सत्ताधारी गटातर्फे यावल शहरात अनेक विकास कामे करण्यात आली त्याची गुणवत्ता बघितली असता या कामांची खैरात वाटली गेली होती का..? मधुकर साखर कारखान्याचे १५ ते १७ कर्मचाऱ्यांना कोट्यावधी रुपयाची थकबाकी मिळत नसल्याने त्यांच्याबाबत कोणताही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही याला काय म्हणावे.. इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
निवडणूक रिंगणात महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसचे धनंजय चौधरी, महायुती तर्फे भाजपाचे अमोल जावळे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमीभा भानुदास पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार अनिल
छबीलदास चौधरी,तर काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार दारा मोहंमद जफर मोहंमद यांच्यासह इतर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या ५ उमेदवारांमध्ये खरी लढत होणार असून.भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि भाजपाचे उमेदवार यांच्या मतांची विभागणी किती प्रमाणात होते ? आणि यात काँग्रेस,भाजप यापैकी कोण विजयी होणार..? किंवा या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार आहे किंवा नाही याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचे लक्ष वेधून आहे.
यावल शहरात प्रत्येक वार्डात भारतीय जनता पक्षाचे सक्रिय प्रमुख पदाधिकारी ( कार्यकर्ते नव्हे ) आहेत परंतु यांच्यात एकमेकात गैरसमज मतभेद वर्चस्वामुळे आणि व्हाट्सअप ग्रुप द्वारा व्हायरल झालेल्या एका क्लिपमुळे हिंदू – मुस्लिम बांधवांच्या जातीय सलोख्यावर म्हणजे मतदानावर काही परिणाम होतो का..? त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षात एक लोकप्रतिनिधी ठराविक गटाच्या संपर्कात राहिल्याने तसेच इतर नागरिकांच्या संपर्कात नसल्याने आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेत त्यांच्याच एका पदाधिकाऱ्यांने ठेकेदाराच्या नावावर निकृष्ट,बोगस प्रतीची कामे करून शासनाला पर्यायी लोकप्रतिनिधीला चुना लावल्याने मतदानावर काय परिणाम होतो..? याकडे संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघाचे लक्ष वेधून आहे.