Friday, November 22, 2024
Homeगुन्हामोठी कारवाई : दोघांकडून ७ गावठी कट्टेसह दहा जिवंत काडतूस जप्त!

मोठी कारवाई : दोघांकडून ७ गावठी कट्टेसह दहा जिवंत काडतूस जप्त!

मोठी कारवाई : दोघांकडून ७ गावठी कट्टेसह दहा जिवंत काडतूस जप्त!

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पोलिसांनी लासूर -हातेड रस्त्यावर दोन जणांकडून सात गावठी कट्टे आणि दहा जिवंत काडतूस जप्त केले आहे. या दोघांना पोलिसांनी दि. २० रोजी अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, उमर्टी (मध्य प्रदेश) कडून दुचाकीवर येणाऱ्या मनोज राजेंद्र खांडेलकर (२४) रा.जुळेवाडी कराड ( सातारा), सागर सरणम रनसौरे (२४) रा.धायरी पुणे यांची चौकशी केली. त्यांच्या जवळ सात गावठी बनावटीचे कट्टे. दहा जिवंत काडतूस मिळून आले. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस राकेश पाटील, रावसाहेब पाटील, शशी पारधी, चेतन महाजन यांनी दि. २० रोजी दुपारी १२: ३० वाजे दरम्यान हातेड – लासूर रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ सापळा लावून ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा मुद्देमाल तसेच त्यांच्या ताब्यातील एक मोटार सायकल, दोन मोबाइल, सातशे रू. रोख असा एकूण दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. राकेश पाटील यांच्या फिर्यादिवरून आरोपींविरुद्ध आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या