Thursday, March 13, 2025
Homeजळगावसावदा येथे शिवसेना शिंदे गटात इनकमिंग जोरात !

सावदा येथे शिवसेना शिंदे गटात इनकमिंग जोरात !

सावदा येथे शिवसेना शिंदे गटात इनकमिंग जोरात !

सावदा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सावदा तालुका रावेर येथे रावेर लोकसभा महिला शिवसेना (शिंदे गट)जिल्हाध्यक्षा सौ. नंदाताई प्रकाश निकम यांचे नेतृत्वाखाली असंख्य महिलांना शिवसेना (शिंदे गट)जाहीर प्रवेश केला आहे.

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री एकनाथराव शिंदे, मुक्ताईनगरचे लोकप्रिय आमदार मा. श्री चंद्रकांतदादा पाटील तसेच रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख श्री समाधानभाऊ महाजन यांचे प्रेरणेने व यांचे नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच शिवसेना (शिंदे गट) रावेर लोकसभा महिला जिल्हाप्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांचे उपस्थितीत दि. 23/01/2025 रोजी दुपारी 4.00 वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात असंख्य महिलांनी शिवसेना (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला आहे.या कार्यक्रमात  महिला शिवसेना रावेर जिल्हाध्यक्षा सौ नंदाताई निकम रावेर व यावल तालुका समन्वयक श्री भगवान पाटील, रावेर शहर प्रमुख श्री वाय.व्ही. पाटील, रावेर तालुका संघटक श्री राहुल पाटील यांची भाषणे झाली व उपस्थित महिलांना सामाजिक व राजकीय मार्गदर्शन केले. आजच्या दिवशी मा. शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांची जयंति असल्याने मा. शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला उपस्थित प्रमुख अतिथीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला मा. बाळासाहेबांच्या कारकिर्दीबद्दल माहिती देण्यात आली.

 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रावेर शिवसेना महिला आघाडीप्रमुख सौ. स्वातीताई भंगाळे, यावल तालुका प्रमुख सौ. पूजाताई पाटील, हरी भगवान पाटील, शिवसेना रावेर महिला उपप्रमुख भारतीताई भारुळे, रावेर शिवसेना महिला आघाडी सरचिटणीस संगीता भंगाळे, सावखेडा उपशहरप्रमुख कविता नहाले, सावखेडा शहरप्रमुख रुपाली महाजन, फैजपूर शहरप्रमुख श्री पिंटूभाऊ मंडवले ई. मंडळी उपस्थित होते. या प्रसंगी वैशाली लीलाधर पाटील यांची सावदा शिवसेना शहरप्रमुख नीता दीपक कोष्टी यांची शिवसेना सावदा शहर उपप्रमुख म्हणून जिल्हाध्यक्ष सौ.नंदाताई निकम यांनी निवड केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या