सुकी नदीच्या पुलावर चारचाकी- दुचाकीचा भीषण अपघात ; प्रौढाचा दुर्देवी मृत्यू तर दोन गंभीर !
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा वाघोदा ते वडगावदरम्यानच्या सुकी नदीच्या पुलावर दि. १४ रोजी चारचाकी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात वडगाव येथील जावेद सत्तार तडवी (३९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, वडगाव येथील जावेद सत्तार तडवी, वसीम करीम (वय ३०) व बबलू अशरफ तडवी (वय २७) हे तिघे जण दुचाकी एमएच ४८ बीएक्स ७९२६ ने वडगाव येथून मोठे वाघोदा मार्गे सावदा येथे गेले होते. परत येत असताना पुलावर चारचाकी एम.एच. १९ सी. वाय.ने त्यांना धडक दिली. या अपघातात जावेद तडवी यांचा जागीच मृत्यू झाला असून, वसीम करीम व बबलू अशरफ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दोघांनाही गंभीर दुखापती असल्यामुळे पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.