Friday, March 14, 2025
Homeजळगावहतनूर कालवा फूटी बाबत जळगाव येथील तापी पाटबंधारे महामंडळासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण.

हतनूर कालवा फूटी बाबत जळगाव येथील तापी पाटबंधारे महामंडळासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण.

हतनूर कालवा फूटी बाबत
जळगाव येथील तापी पाटबंधारे महामंडळासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण.

यावल दि.१५    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत हतनूर धरणापासून यावल,रावेर, चोपडा तालुक्यात गेलेल्या हतनूर धरण पाट फूटी बाबत व इतर काही कारणास्तव चौकशी व कार्यवाही होण्यासाठी नशिराबाद येथील नितीन सुरेश रंधे हे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते सोमवार दि.१७ मार्च २०२५ पासून तापी पाटबंधारे महामंडळ जळगाव येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत.
लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव अधीक्षक अभियंता यांच्याकडे दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात नितीन रंधे यांनी नमूद केले आहे की.जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांचे अंतर्गत हतनूर उजवा कालवा किलोमीटर १४,१५ सूर जलसेतू जवळ व मान माळी जलसेतू जवळ हंगाम २०२४-२५ मध्ये कालवा फुटण्याची घटना घडली आहे त्यामुळे चालू रब्बी हंगामात शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले.
दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत प्रत्यक्षात मात्र काही कामे होत नाहीत याबाबत गेल्या तीन वर्षापासून सारखे तक्रार अर्ज केले आहे त्याचा तपासणी अहवाल अद्याप दिला नाही व चौकशी न करता अर्ज निकाली काढण्यात आले आणि तसे अधीक्षक अभियंता दक्षता पथक ठाणे यांनी कळविले आहे यात आपण दक्षता पथक यांचे संगनमताने प्रकरण दाबले असल्याचे दिसून आले आहे.
तक्रार अर्ज केल्यावर सुद्धा त्याची खात्री न करता माझी खोटी स्वाक्षरी करून अर्ज निकाली काढला याबाबत कोणताही साक्षीदार किंवा पुरावा घेतला नाही हे संशयास्पद आहे तरी याप्रकरणी माझे समाधान न झाल्याने सोमवार दि.१७ मार्च २०२५ पासून मी तापी पाटबंधारे महामंडळ जळगाव कार्यालय उपोषणा बसत आहे याची नोंद घ्यावी या निवेदनाच्या प्रति संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
उपोषण सुरू होत आहे तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी काय दखल घेतली आणि आता काय दखल घेणार आहेत याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या