१६०० रुपयांच्या साग चौपटा यावल पश्चिम वन विभागाने जमा केल्या.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल यांच्या कार्यक्षेत्रात काल मंगळवार दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास १ हजार ६६० रुपये किमतीच्या सागवान लाकडाच्या एकूण ५ चौपट बेवारस स्थितीत असलेल्या हरिपुरा राऊंड स्टाफ यांना आढळून आल्याने साग चोपट
नग ०५ घ.मी. ०.०८२ अंदाजे मा.किमत.१६६० रु. /- जप्त करून शासकीय वाहनाने मु.वि. केंद्र यावल येथे पावतीने जमा केले, गुन्हे प्रकरणे. प्र. री. क्र.१०/२०२४ अन्वये व.र. हरिपूरा यानी नोंदवीला सदर ही कार्यवाही जळगाव येथील यावल वनविभाग उपवन संरक्षक जमीर शेख. सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक समाधान पाटील यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे व वनरक्षक हरिपूरा अशरफ तडवी,वनरक्षक सुधीर पटणे,वनरक्षक अक्षय रोकडे व वाहन चालक शरद पाटील यांनी केली तसेच पुढील तपास अशरफ तडवी वनपाल हरीपुरा (अतिरिक्त कार्यभार) हे करीत आहे.