अॅड. जगदीश शामराव कापडे यांचा निवडणूक सन्देश
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मी अॅड. जगदीश शामराव कापडे, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख आणि फौजदारी विषयातील ज्येष्ठ विधीतज्ञ, 1985 पासून राजकारण व समाजकार्य क्षेत्रात सातत्याने सक्रिय आहे. समाजहिताचे काम प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.
मी 1983 साली वकिली व्यवसायाला सुरुवात केली आणि त्याआधीपासूनच राजकारण व समाजकार्यात सक्रिय होतो. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षाची संघटना उभी करण्याचे कार्य हाती घेतले. नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार अशा विविध शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या निवड प्रक्रियेत मी भरगोस यश मिळवले. हे यश केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद आणि आपल्या बहुमूल्य सहकार्यामुळे शक्य झाले.
माझ्या कार्यकाळात मी नेहमी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे राहिलो आहे. वकिली, समाजकार्य किंवा राजकारण – कोणत्याही क्षेत्रात आलेल्या व्यक्तीस न्याय मिळावा, हा माझा कायमस्वरूपी सिद्धांत राहिला आहे.
आज आयुष्याच्या या टप्यावरही मी कार्यात मगन आहे, परंतु वयानुसार हे कार्य किती काळ करता येईल, याबाबत साशंकता आहे. म्हणून, हा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी माझ्या जेष्ठ चिरंजीव मिलिंद जगदीश कापडे यांच्यावर सोपवून, मी त्यास भुसावळ नगर परिषद 2025 चे प्रभाग क्रमांक 11 अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून आपल्यासमोर सादर करत आहे.

