Saturday, December 13, 2025
Homeजळगावअशोक पितांबर चौधरी ऊर्फ आऊभाऊ व उर्मिला रामदास सावकारे उमेदवारीचे तगडे आव्हान,प्रचाराला...

अशोक पितांबर चौधरी ऊर्फ आऊभाऊ व उर्मिला रामदास सावकारे उमेदवारीचे तगडे आव्हान,प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

अशोक पितांबर चौधरी ऊर्फ आऊभाऊ व उर्मिला रामदास सावकारे उमेदवारीचे तगडे आव्हान,प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक 5 ‘अ’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उर्मिला रामदास सावकारे आणि ‘ब’ अशोक पितांबर चौधरी ऊर्फ (आऊभाऊ) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाच त्यांच्या प्रचाराने प्रभागात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उच्चशिक्षित,संयमी,सुसंस्कृत आणि विश्वासू अशी ओळख असलेल्या अशोक पितांबर चौधरी यांनी जनतेच्या हक्कासाठी “ना जाती, ना पातीसाठी… माझी उमेदवारी फक्त आणि फक्त प्रभागाच्या विकासासाठी” असे ठाम ध्येय घेऊन मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचार मिरवणुकीला प्रभागातील महिला-पुरुष मतदारांचा स्वयंस्फूर्तीने उदंड प्रतिसाद मिळत आहे. घराघरात महिलांनी औक्षण करून त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे.
प्रचारादरम्यान प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि पाणी, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट अशा प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रभागाचा कायापालट करण्याचे ठोस आश्वासन देत आहेत. त्यांच्या या दमदार प्रचारामुळे प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले असून मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वासाची भावना दिसून येत आहे.प्रचार मिरवणुकीत प्रभागातील शेकडो नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत अनेक मान्यवर व कार्यकर्ते उत्साहाने सहभाग घेत आहेत. या सर्वांच्या अनमोल सहकार्यामुळे प्रचाराला अधिकच बळ मिळाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या