भुसावळ, खानदेश नवीन वीस प्रतिनिधी दि. 01/12/2025 : भुसावळ नगरपालिकेची रणधुमाळी आता जोर पकडू लागलेली असून मतदारांसह उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

प्रभाग क्रमांक 10 ‘ब’ या मधील सर्वसाधारण महिला अपक्ष उमेदवार यांच्या महारॅलीमध्ये काल मेहतर वाल्मिकी समाजाने एकदिलाने व एकजूट होऊन सहभागी होऊन उमेदवार सीमा संतोष थामेद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे काल दिसून आलेले आहे. वाल्मिकी मेहतर समाजासह सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसह महिला व पुरूषांनी मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने दिलेल्या पाठबळामुळे त्यांच्या प्रचाराला कमालीची ताकद मिळाली असून, त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलेला होता. त्यामुळे त्यांचा विजय आता शंभर टक्के निश्चित असल्याचा ठाम विश्वास सफाई कामगार नेता श्री संतोषजी थामेद यांनी त्यांनी व्यक्त केला आहे.
“मी सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन घेऊन उतरले आहे. प्रचारादरम्यान घरोघरी मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम पाहता विजय आमचाच आहे,” असे सौ.सीमा संतोष थामेद यांनी सांगितले आहे.

दरम्यान, प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिकी समाजाच्या कामगारांच्या विविध प्रकारच्या समस्या आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक तथा कामगार नेता संतोष थामेद यांच्या जनहिताच्या सातत्यपूर्ण कामामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत असून त्यांच्या पत्नी सौ.सीमा संतोष थामेद यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.

