मुक्ताईनगर – दुःखद निधन
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील हरी जिवराम चौधरी (वय 79) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हरी चौधरी हे एस.टी. महामंडळाचे निवृत्त कर्मचारी होते. आपल्या विनम्र स्वभाव, मनमिळाऊ वृत्ती आणि समाजकार्यातील सक्रिय सहभागामुळे ते सर्वांचे लाडके होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
हरी चौधरी यांच्या निधनाने चौधरी कुटुंबासह मुक्ताईनगर परिसर एका आदरणीय नागरिकास मुकला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

