Sunday, January 25, 2026
Homeजळगावभुसावळ येथील सेंट अलायसिंस शाळेतील प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई करा  हिंदुत्ववादी संघटनांची ...

भुसावळ येथील सेंट अलायसिंस शाळेतील प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई करा  हिंदुत्ववादी संघटनांची  मागणी

भुसावळ येथील सेंट अलायसिंस शाळेतील प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई करा  हिंदुत्ववादी संघटनांची  मागणी

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ येथील सेंट अलायसिंस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना इतर प्रार्थनास्थळांवर नेऊन त्यांच्या बालमनावर आघात झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणात दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणात शाळेतील मुलांना प्रार्थना स्थळा वर नेवुन इतर धर्माचा प्रचार करण्यास भाग पाडले असल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी आठ शिक्षकावर  शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

येथील लक्ष्मी वेंकटेश मंदिरात आयोजित   पत्रकार परिषदेत बोलताना संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आणखी कडक कलमे—विशेषतः पोक्सोची लागू करण्याची गरज आहे, जेणेकरून बालकांवर झालेल्या मनोवैज्ञानिक परिणामांची दखल घेऊन कडक शिक्षा शक्य होईल.

तसेच या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा दावा करत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी नवीन कायदा मंजूर करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.
या प्रकरणाबाबत हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले असून हिंदू संघटनांना कमजोर समजु नये कोणीही दबाव आणून प्रकरण शिथिल करण्याचा प्रयत्न करू नये आधीच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्य साठी विलंब करण्यात आला आहे .

संघटनांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी व्यक्त केली, जेणेकरून पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यास विलंब होणार नाही.

या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोणतीही समस्या असल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात �

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या