Sunday, January 25, 2026
Homeगुन्हाबेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह एका विहिरीत आढळला !

बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह एका विहिरीत आढळला !

बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह एका विहिरीत आढळला !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील गांधली येथून १० रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १२ रोजी गावातीलच गांधली येथून १० रोजी बेपत्ता झालेल्या एका विहिरीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गांधली येथील जयश्री संजय संदानशिव (वय १८) ही बारावीचे शिक्षण घेणारी तरुणी १० रोजी दुपारी कोणालाच काहिही न सांगता घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या घरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ती आढळून आली नव्हती. दरम्यान, १२ रोजी दुपारी १२ वाजता जयश्रीच्या वडिलांना सुनील पाटील यांचा फोन आला, त्यांनी सांगितले की, गांधली येथीलच धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह आढळला आहे. तिच्या अंगावर काळ्या रंगाची ओढणी दिसत आहे. तर तुम्ही येऊन खात्री करा. यानंतर जयश्रीच्या वडिलांनी खात्री केली असता तो मृतदेह जयश्रीचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हे. कॉ. गणेश पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या