Thursday, November 21, 2024
Homeजळगावभुसावळ बाजारपेठ डीबी पथकातील निलेश चौधरी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित

भुसावळ बाजारपेठ डीबी पथकातील निलेश चौधरी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित

 भुसावळ बाजारपेठ डीबी पथकातील निलेश चौधरी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील गुंजाळ कॉलनीतील झालेल्या घरफोडीचा तपास 12 तासात लावणाऱ्या डि. बी पथकातील निलेश चौधरी यांना जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

भुसावळ शहरातील गुंजाळ कॉलनीतील रहिवासी रामप्रसाद गोपाल चंदन वय वर्ष 66 यांच्या घरी कोणीतरी अज्ञात इसमाने घोरफोडी करून घरातील 2 लाख 69 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले होते. सदर गुंन्हाचा तपास बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे ,पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शना प्रमाणे दाखल करण्यात आलेल्या आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना देण्यात आल्या. डीबी पथकातील निलेश चौधरी यांना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराकडून घरफोडी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली संशयित आरोपी जावेद शेख शकील वय वर्षे25 राहणार रामदास वाडी खडका रोड भुसावळ यास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील गेलेला माल 2 लाख 69 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली. या कामगिरी करिता जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते PSI मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार निलेश चौधरी, पोलीस शिपाई जावेद शहा आणि पोलीस शिपाई राहुल वानखेडे यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या