खेमचंद भोई याची राज्य कबड्डी संघात निवड !
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वरणगाव येथिल हनुमान व्यायामशाळेचा मल्ल तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव कबड्डी संघाचा अष्टपैलू खेळाडू खेमचंद दिलीप भोई याची जळगाव जिल्ह्यातुन पुरुष गटात महाराष्ट्र राज्य कबड्डी संघामधे निवड झाली आहे .हि निवड शरद पवार आजीव अध्यक्ष व अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशन शिवाजी पार्क मैदान दादर या कबड्डी फेडरेशनतर्फे जुलै महिन्यात मुंबई येथे आयोजित केलेल्या क्रिडा स्पर्धेतून करण्यात आली आहे . पुढिल प्रशिक्षण शिबिर २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पर्यंत बालेवाडी ‘ बाणेर ‘ पुणे येथे होणार आहे . जळगाव जिल्हयाहुन वरणगावच्या सर्वसाधारण कुटुंबातील खेमचंद भोई याची राज्य कबड्डी संघात निवड झाल्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .