भुसावळ येथील आक्रोश मोर्चा हा केवळ दिशाभूल व भाजपाला बदनाम करण्याचा डाव – गटनेते युवराज लोणारी
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ येथे सोमवारी काढण्यात आलेला राष्ट्रवादी व इतर पक्षांनी काढलेला मोर्चा हा केवळ दिशाभूल करणारा व भाजपाला बदनाम करण्यासाठी असल्याची माहिती भाजपाचे गटनेते युवराज लोणारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे .
याप्रसंगी पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे,नगरसेवक परी क्षीत बऱ्हाटे ,किरण कोलते , छाया देशमुख सोनल महाजन , गिरीश महाजन, राजु आवटे व इतर नगसेवक उपस्थित होते.लोणारी यांनी सांगितले की माजी आमदार व स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी जी सभा नगराध्यक्षा यांना सांगून स्थगित केलेली आहे बेकायदेशीर असून सभागृहात.मुद्दाम हिंदू मुस्लिम यांच्या वाद कसा निर्माण होईल याचे पूर्ण नियोजन करून त्या ठिकाणी वाद करण्यात आला .
तसेच सोमवारी झालेल्या मोर्चामध्ये अपंग बांधवांना खोटा मेसेज पाठवून आम्ही तुम्हाला अपंग निधी देण्यात तयारी परंतु भाजप विरोध करत आहे असे सांगून बोलावण्यात आले होते . तसेच तृतीयपंथीयांना सुद्धा आम्ही तुम्हाला घरी देऊ असे सांगून बोलावलेले होते .
17 तारखेला बैठकीचा पत्रकारांना मज्याव करणे हे चुकीचे काम त्यांनी केलेले आहे . भाजपच्या नगरसेवकांना केव्हा बदनाम करणे हा त्यातील डाव असून आम्ही नगर परिषदेत घडलेल्या सर्व व्हिडिओ चित्रण हे भुसावळच्या चौका चौकात दाखवून नेमके सभा तहकूब करणारे कोण मुद्दाम बदनाम करणारे कोण हे दाखवणार आहे .आक्रोश मोर्चामध्ये जगन सोनवणे हे जे बोलत आहेत त्यांनी चार महिन्यापूर्वी स्वीकृत नगरसेवकांबद्दल काय बोलले होते हे सर्वांना माहीत आहे . मंत्रि सावकारे यांना गती रोधक मंत्री म्हणत आहे . परंतु ते सुद्धा महामंत्री होते आणि आताचे पॉकेट मंत्री आहे . या मोर्चात बरेच फ्राड करणारे व्यक्ती सहभागी झाले होते .
मोर्चाकरांना ज्या वेळेला गोरगरिबांचा दवाखाना पाडला त्यावेळेला आक्रोश मोर्चा का काढला नाही असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे .भुसावळमध्ये सर्व विकासकामे थांबवण्याचे षडयंत्र केवल सत्ताधारी गटच करीत आहे . लोकांना पाणी पुरवठा सुरळीत होत नाही पाच दिवसांनी पाणी देण्याचे आश्वासन त्यांनी पाळले नाही उलट दुषित पाणी पुरवठा होत आहे .शहरात भाजपाने केव्हाही विकास कामाला प्राधान्य दिलेले आहे .भुसावळची आजची कंडीशन पाहता सार्वजनिक स्वच्छालय ,कचरा उचलणे हे सर्व कामे ठप्प झाल्यासारखे आहे . ठेकेदारांना टक्केवारी मागितली जात आहे .
आमच्यावर आरोप केला गेला कि,महापुरुषांच्या किंवा कोणत्याही धर्माच्या प्रार्थना स्थळ व पुतळ्यांना दुरुस्तीला कधी विरोध नाही . या उलट आम्ही स्थळांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव दिले आहे . 77 विकासाचे विषय पारीत सुद्धा सत्ताधारींनी आतापर्यंत कोणत्याही विषयावर कार्य न केल्याने किंवा मंजुरी न दिल्याने मंत्री महोदय संजय सावकारे यांनी उपलब्ध केलेला निधी सुद्धा परत केल्यामुळे भुसावळचा विकास थांबत आहे .केवळ भाजपाच्या विरोधामुळे विकास थांबला अशी चुकीचा संदेश सत्ताधारी देत आहे . परंतु भुसावळची जनता आहे सर्व जाणून असल्याने त्यांच्या हे लक्षात येत आहे . कि सताधारी गटालाचा विकास होवु दयायचा नाही .