Tuesday, June 9, 2026
Homeजळगावअखेर सुनील महाजन यांनी सभापती पदाचा दिला राजीनामा 

अखेर सुनील महाजन यांनी सभापती पदाचा दिला राजीनामा 

अखेर सुनील महाजन यांनी सभापती पदाचा दिला राजीनामा

 

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – गेल्या काही दिवसापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांमध्ये अंतर्गत धुसफुस उफाळली आहे. त्यामुळे तब्बल १३ संचालकांनी सभापती सुनिल महाजन यांच्या विरूध्द दि. २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. अखेर आज दि.८ मे रोजी सुनील महाजन यांनी सभापती पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

 

अविश्वासापुर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या राजकारणाला कलाटणी मिळाली होती.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी गेल्या आठवड्यातच सभापती सुनिल महाजन यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव आणत १३ संचालकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सादर केले होते.सभापती सुनिल महाजन यांचे संचालक मंडळाशी वागणे बेजबाबदार असुन अकार्यशिल आहे असा ठपका संचालकांनी ठेवला होता. दरम्यान संचालकांनी अविश्वासाची तयारी सुरू केली असतांना दुसरीकडे सुनील महाजन यांनी चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांची भेट घेवून त्यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर आज थेट उपनिबंधक कार्यालयाकडे राजीनामा सोपवला आहे. आता आगामी काळात नव्याने कोण सभापती होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

 

सभापतींनी उपनिबंधकांकडे राजीनामा दिला असल्याने आता जिल्हा उपनिबंधकांकडून नव्याने सभापती निवडीचा कार्यक्रम घोषीत केला जाईल. आगामी आठवड्यात ही निवड प्रक्रीया होईल असे देखील सांगण्यात येत आहे. गेल्यावेळेस राजकीय खेळी खेळत सुनील महाजनांनी ऐनवेळेस सभापती पदाचा अर्ज भरत राजकीय समिकरण जुळवले होते. तर लकी टेलर यांना मात्र खुर्चीपासून दुर रहावे लागले होते. त्यामुळे सभापती पदाची संधी आता नेमकी कुणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या