Sunday, May 24, 2026
Homeभुसावळभुसावळात उद्या अंडर-19 टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी

भुसावळात उद्या अंडर-19 टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची होणार निवड; खेळाडूंना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या राज्यस्तरीय जूनियर १९ वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, २५ मे रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ येथील नाहाटा कॉलेज मैदानावर मुला-मुलींसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ४ ते ६ जून २०२६ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निश्चित करण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंची जन्मतारीख ३० जून २००७ नंतरची असणे आवश्यक आहे.निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आधार कार्ड, जन्म दाखल्याची झेरॉक्स प्रत तसेच क्रिकेटचा संपूर्ण गणवेश सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या