एसटी बस चालकास दुचाकी चालकांनी मारहाण केल्याने एसटीची सेवा अडीच तास बंद.

६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२4
धुळे यावल बस चालकास दुचाकी स्वाराने बस समोर अचानक येऊन तुला बघून घेईन एस.टी.बस कशी चालवतो अशी धमकी देत यावल आगारात जाऊन बस चालकास मारहाण करून त्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याने यावल पोलीस स्टेशनला ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या निषेधार्थ यावंल आगारातील वाहक चालकांनी प्रवाशांची एस.टी.बस सेवा अडीच तास बस बंद ठेवली होती.
परिणामी प्रवाशांची भर दुपारी गैरसोय झाली.बसचालक रफिक मुस्तफा शेख राहणार शिवाजीनगर यावल हा आज दि.२४ मे रोजी धुळे येथून यावलकडे बी डब्ल्यू ०८ – ५४ या एस.टी.बस धुळे येथून यावल येथे येत असताना यावल पासून दोन किलोमीटर अंतरावर यावल चोपडा रस्त्यावरील वनविभाग कार्यालया जवळ १२:२० वाजेच्या सुमारास एक मोटर सायकल स्वार अचानक बस समोर आला असता बसत चालकाने बस डाव्या बाजूला वळवली तेव्हा मोटरसायकल चालक यांनी बसचालकाला शिवीगाळ केली आणि बस डेपो मध्ये घेऊन चल मी तुला बघून घेतो.आणि तो बसच्या पुढे गाडी चालवत सरळ साडेबारा वाजता यावंल आगारात आला त्यावेळेस बस चालकाने बस मधून प्रवासी उतरवून बस आगारांमध्ये जमा केली आणि बस आगारातील गेट जवळ उभा राहिलो असता मोटर सायकल स्वार तेथे आला आणि त्याने शिवीगाळ केली त्यावेळी बस स्टॅन्ड मध्ये बसलेले त्याचे ओळखीचे महिला व एक पुरुष देखील उठून बस आगरात आले
मी त्यांना बसमधील चालक सुनील रमेश कोळी हे मोबाईलवर फोटो व व्हिडिओ काढत होते तेव्हा त्यांनी मोबाईल हातातून हिसकावून खाली फेकला आणि मोबाईल उचलून सुनील कोळी याचे उजव्या डोळ्याचे वर भुईवर हाताचा ठोसा मारला त्यावेळी आरोपी महेंद्र सोनवणे फोनवरून बोलत असताना मला व माझा भाऊ जितेंद्र आणि वहिनी वैशाली सोनवणे व यांना मारहाण केली असे म्हणत होता त्यावेळी या दोघांनी सुनील कोळी यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केली या कारणावरून यावल पोलिसात महेंद्र मनोहर सोनवणे, जितेंद्र मनोहर सोनवणे वैशाली जितेंद्र सोनवणे आणि इतर तीन अनोळखी अशा ६ जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

