Friday, November 22, 2024
Homeभुसावळभुसावळात कोसळलेल्या घरांची आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !

भुसावळात कोसळलेल्या घरांची आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !

भुसावळात कोसळलेल्या घरांची आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. भिजत पावसामुळे शहरातील यावल रोडवर तापी नदी जवळ असलेल्या सर्वे क्रमांक ७८ ब मधिल साईचंद्र नगरात रविवार २५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तीन दुमजली घरे कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी शहरात सकाळी ११.३० वाजता घटनास्थळी दाखल होत घराची पाहणी केली. त्याचबरोबर आजुबाजूच्या किती घरांना तडा गेल्या आहेत याची देखील पाहणी केली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, यावेळी स्थानिक रहिवाश्यांनी आपली व्यथा जिल्हाधिकारी डॉ आयुष्य प्रसाद यांच्या कडे मांडुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर अत्तरदे सहकारी अतुल मोहिते, योगेश सोनार यांना भ्रमणध्वनी वर संर्पक केला असता ते बेजबाबदार पणे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे हि जिल्हाधिकारी यांना सांगितले. रहिवाशांच्या समस्या ऐकल्यानंतर तुम्हाला जर आमची फसवणूक झाली आहे असे वाटत तर तुम्ही पोलीसात रीतसर तक्रार देऊ शकतात असे सांगितले. यावर रहिवाशांनी आमची एफ आय आर त्वरीत दाखल करण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर आवश्यक त्या सुचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी नगरपालिका प्रशासनाला सुध्दा आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. सर्वे क्रमांक ७८ ब मध्ये चंद्रशेखर अत्तरदे यांनी काही वर्षांपूर्वी साई चंद्रनगरची निर्मिती केली या नगरात सुमारे १५० पेक्षा जास्त परिवाराचे वास्तव्य आहे .शहराच्या उतारावर व तापी नदी जवळ वसलेल्या या भागात पालिकेने समोर एक कोटी रुपये खर्चातून संरक्षण भिंत बांधली होती पण पाण्याचा व्यवस्थित निचरा करण्याची व्यवस्था नव्हती.सततधार पावसामुळे पालिकेची संरक्षण भिंत रविवारी सकाळी खचली त्यामुळे तीन हि घराला तडे गेले. सुदैवाने रहिवाशांनी घरे रिकामी केल्याने जिवितहानी टळली. दुपारी दोन वाजे नंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे तीनही घरे कोसळली सुदैवाने प्राणहानी टळली.
भुसावळ शहरात अजुन किती जुन्या इमारती आहेत त्याचा देखील आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाकडून घेत सुचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी घराची पाहणी करण्या दरम्यान त्याच्या सोबत यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे , मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उप मुख्याधिकारी लोकेश ढाके, परवेश शेख उपस्थित होते.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या